महावितरणच्या गलथान कारभाराविरुद्ध आज मारेगाव येथे मनसेचा भव्य झटका मोर्चा


प्रशांत चंदनखेडे वणी 

महावितरणच्या गलथान कारभारामुळे मारेगाव येथील शेतकऱ्यांचे सिंचनाचे प्रश्न निर्माण झाले असून अघोषित भारनियमन व विजेच्या लपंडावामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीस आली आहे. वेळी अवेळी वीज पुरवठा खंडित होत असल्याने ओलित शेती धोक्यात आली असून सिंचनाअभावी उभी पिकं करपायला लागली आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग कमालीचा चिंतेत आला आहे. वारंवार खंडित होणाऱ्या विज पुरवठ्यामुळे शेतात ओलित करणे कठीण झाले असून महावितरण अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणाचा फटका शेतपिकांना बसू लागला आहे. वेळोवेळी वीज पुरवठा खंडित होत असल्याने जनतेतूनही मोठा संताप व्यक्त होतांना दिसत आहे. वीज पुरवठा सुरळीत सुरु ठेवण्याची अनेकदा मागणी करूनही मुजोर अधिकारी याकडे लक्ष द्यायला तयार नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून पक्ष नेते राजू उंबरकर यांच्या नेतृत्वात आज २८ नोव्हेंबरला भव्य झटका मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. महावितरणचा ढेपाळलेला कारभार व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणाविरुद्ध मनसेने आयोजित केलेल्या झटका मोर्च्यात मनसे नेते राजू उंबरकर यांच्यासह मारेगाव येथील हजारो नागरिक रस्त्यावर उतरणार आहेत. सकाळी ११ वाजता मार्डी चौकातून तहसील कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
 
शेतकऱ्यांचा सध्या रब्बी पिकांचा हंगाम सुरु असून शेतकऱ्यांना रब्बी पिकांची काळजी लागली आहे. रब्बी पिकांना सिंचनाची अत्यंत गरज असते. सिंचनाकरिता वीज पुरवठा सुरळीत असणे गरजेचे असतांना वेळी अवेळी वीज पुरवठा खंडित होत असल्याने शेतकरी चिंतेत आला आहे. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने शेतात ओलित करणे कठीण झाले आहे. महावितरणच्या गलथान कारभारामुळे शेत सिंचनाचे प्रश्न निर्माण झाले असून सिंचनाअभावी उभी पिकं करपायला लागली आहेत. वीज पुरवठा सुरळीत सुरु ठेवण्याकरिता शेतकऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदने दिली. तसेच शेतात नवीन वीज जोडणीकरिता अर्जही दिले आहेत. पण शेतकऱ्यांच्या या महत्वपूर्ण प्रश्नांकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी कायम दुर्लक्ष केले. महावितरणच्या दुर्लक्षित धोरणाचा फटका शेत सिंचनाला बसू लागला आहे. तसेच विजेच्या लपंडावामुळे मारेगाव शहर व तालुक्यातील जनताही कमालीची वैतागली आहे. महावितरणचे अधिकारी वीज पुरवठ्याची समस्या गांभीर्याने घेतांना दिसत नाही. वेळोवेळी अकारण वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना चांगलाच मनःस्ताप सहन करावा लागत आहे. विजेच्या लपंडावामुळे छोटे व्यावसायिक चांगलेच डबघाईस आले आहेत. दिवसातून कित्येकदा वीज पुरवठा खंडित होतो. वीज केंव्हा व कधी गुल होईल याचा आता नेमच राहिलेला नाही. त्यामुळे वीज पुरवठ्याची समस्या सोडविण्याची मागणी शेतकऱ्यांनी राजू उंबरकर यांच्याकडे केली. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याला प्राथमिकता देणाऱ्या राजू उंबरकर यांनी महावितरणमुळे उद्भवलेल्या परिस्थीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या. महावितरणच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत असल्याचं मनसे नेते राजू उंबरकर यांच्या लक्षात आल्याने त्यांनी आक्रमक भूमिका घेत महावितरण विरुद्ध रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या नेतृत्वात आज मारेगाव येथे भव्य झटका मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. महावितरणच्या ढेपाळलेल्या कारभारामुळे वैतागलेले हजारो नागरिक मनसेच्या या झटका मोर्चात सहभागी होणार आहेत. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी