प्रशांत चंदनखेडे वणी :-
शहरातील प्रभाग क्रमांक ११ मध्ये गेल्या दोन दशकांपासून विकासाच्या अपेक्षा अपुऱ्या राहिल्या असताना, यंदा या प्रभागात युवा नेतृत्वाचा उदय झाला आहे. सामाजिक कार्यात आघाडीवर असलेले मिलिंद राजू बावणे हे प्रभागातील लोकांच्या विश्वासाचे केंद्रबिंदू ठरत आहेत.
नगर पालिका निवडणुकीत रंगारीपुरा हा प्रभाग क्रमांक ११ मधील निर्णायक भाग मानला जातो. मागील तीन निवडणुकांमध्ये या भागातील उमेदवाराने दुसऱ्या क्रमांकावर मजल मारल्याने येथील जनतेचे मत महत्त्वाचे ठरते. याच पार्श्वभूमीवर यंदा मिलिंद बावणे हा युवक युवा नेतृत्व म्हणून पुढे सरसावला आहे.
मिलिंद बावणे हे शिवजन्मोत्सव युवा मित्र मंडळ, वणी चे अध्यक्ष असून त्यांच्या नेतृत्वाखाली सलग दोन वर्षे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य रॅली, मोफत नेत्र तपासणी, आरोग्य शिबिरे, औषध वाटप तसेच शैक्षणिक सहाय्य उपक्रम राबविण्यात आले आहेत. तसेच १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, भगतसिंग जयंती, श्रीराम नवमी अशा प्रसंगी विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांद्वारे प्रभागात त्यांनी सामाजिक ऐक्य जपले आहे.
“राजकारणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या सुशिक्षित लोकांवर अशिक्षित लोक राज्य करतात, या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित होऊन मी समाजासाठी काहीतरी सकारात्मक करण्याचा निर्धार केला आहे,” असे मिलिंद बावणे यांनी सांगितले.
त्यांचे ध्येय केवळ निवडणूक जिंकणे नसून — “समाज घडविणे आणि विकास साधणे” हे आहे. प्रभाग क्रमांक ११ मधील नागरिकांनी सहकार्य आणि विश्वास दाखविल्यास तसेच बदल घडवून आणल्यास या वेळी खऱ्या अर्थाने विकास साध्य होईल, असा ठाम विश्वास मिलिंद बावणे यांनी व्यक्त केला आहे.

No comments: