वणी पोलिस स्टेशन येथे आज भव्य रक्तदान शिबीर, रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी घेतला पुढाकार
प्रशांत चंदनखेडे वणी
यवतमाळ जिल्हा पोलिस दलाच्या माध्यमातून रक्तदान शिबिरांचं आयोजन केलं जात आहे. आज १६ मे ला वणी पोलिस स्टेशनच्या दक्षता सभागृहात भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. सकाळी ८ ते सांयकाळी ५ वाजेपर्यंत पर्यंत हे शिबीर राहणार आहे. आजचा हा धकाधकीचा काळ व मनुष्याची बदललेली जीवनपद्धती यामुळे मानवाला विविध आजारांची लागण होऊ लागली आहे. काही असे आजार आहेत की ज्यामुळे शरीराला सतत रक्ताची गरज भासते. तसेच अपघातात अती रक्तस्त्राव झालेल्या व्यक्तींनाही रक्ताची गरज भासते. त्यामुळे रक्त पेढीत पुरेसा रक्त साठा उपलब्ध रहावा याकरिता सुदृढ लोकांनी रक्तदान करणं गरजेचं आहे. रक्ताच्या उप्लब्धतेअभावी कोणत्याही रुग्णाचा जीव जाऊ नये, हा मानवी दृष्टिकोन जोपासून प्रत्येकाने रक्तदान करण्याची गरज निर्माण झाली आहे. आपल्या रक्तामुळे कुणाचा जीव वाचू शकतो, याची जाणीव ठेऊन नागरिकांनी पोलिस स्टेशन येथे आयोजित रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने सहभाग दर्शविण्याचे आव्हान पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. कारण रक्त हे कृत्रिमरित्या तयार करता येत नाही. ते शरीरातच तयार होतं. आपल्या शरीरातील रक्ताने दुसऱ्याच्या शरीरात जीव ओतला जाऊ शकतो. आपल्या रक्तामुळे कुणाला जीवनदान मिळत असेल तर यापेक्षा मोठं पुण्यकर्म दुसरं कोणतंही नाही. सतत रक्ताची गरज भासत असलेल्या जीवांचं जतन करण्याकरिता रक्तदान करणं गरजेचं झालं आहे. रक्तपेढीतील रक्त साठा कमी होऊ नये, व रक्ताच्या उप्लब्धतेअभावी रुग्णाचा जीव जाऊ नये, याकरिता माणुसकीच्या दृष्टिकोनातून प्रत्येकानेच रक्तदान करणं गरजेचं आहे. रक्ताचं वेळोवेळी संकलन न झाल्यास रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे रक्तदानाची गरज ओळखून रक्तदात्यांनी रक्तदान शिबिरांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला पाहिजे. जिल्हा पोलिस दलाच्या माध्यमातून व उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या सहकार्यातून वणी पोलिस स्टेशनच्या दक्षता सभागृहात भव्य रक्तदान शिबीराचं आयोजन करण्यात आलं आहे. या रक्तदान शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे कडकडीचे आव्हान पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment