तालुक्यात अपघाताचे सत्र सुरूच, अज्ञात वाहनाच्या धडकेत आणखी एका युवकाचा गेला बळी


प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी शहराला जोडणारे प्रमुख रस्ते मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा बनले आहेत. मालवाहू वाहतुकीची वाहने मार्गात काळ बनून निष्पाप जीवांचे बळी घेऊ लागली आहे. मालवाहू वाहतुकीच्या वाहनांमुळे प्रमुख रस्ते आता मृत्यूचा मार्ग बनले आहेत. मुख्य मार्गांवर अपघातांचं सत्र सुरुच असून अपघातांमुळे नागरिकांचे नाहक बळी जाऊ लागले आहेत. सतत होणाऱ्या या अपघातांमुळे तालुका चांगलाच हादरला आहे. वणी यवतमाळ मार्गावरील लालपुलिया परिसरात काल १४ मे ला रात्री ९.३० वाजताच्या सुमारास आणखी एक अपघाताची घटना घडली. लालपुलिया परिसरातील एफसीआय कोलडेपो जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत केरला टायर येथे कामाला असलेला अब्दुल सत्तार मोहम्मद नाजीर वय अंदाजे ५० वर्ष हा युवक जागीच ठार झाला. अज्ञात वाहनाने त्याला अक्षरशः चिरडल्याने त्याच्या शरीराचे अवयव रस्त्यावर विखुरले होते. 

अपघातात मृत्युमुखी पडलेला हा युवक दोन ते तीन दिवसांपूर्वीच केरला टायर येथे कमला लागल्याचे सांगण्यात येते. तो परप्रांतीय असून सध्या नागपूर येथे वास्तव्यास असल्याचे समजते. हल्ली तो केरला टायर येथे मजुरांसाठी असलेल्या निवास्थानात रहात होता. काल रात्री काही कामानिमित्त तो लालपुलिया परिसरात पायी जात असतांना अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. तो वाहनाखाली अक्षरशः चिरडल्या गेल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणी करिता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. अज्ञात वाहनाचा अद्याप शोध लागला नसून पोलिस वाहनाचा शोध घेत आहे.   

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी