डीबी पथकाने अवघ्या काही तासांतच केला रहस्यमय खुनाचा उलगडा, तरुणीच्या खुन्याला केले जेरबंद

 



वणी घुगगुस मार्गावरील जैन ले - आऊट परिसरात असलेल्या कृष्णा अपार्टमेंट या इमारतीमध्ये पहिल्या माळ्यावर किरायाने रहात असलेल्या तरुणीचा काल 29 मे ला अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ माजली होती. या तरुणीचा अज्ञात इसमाने खून केल्याचे नंतर पोलिस तपासात निष्पन्न झाले. घटनेचा उलगडा व खुण्याचा शोध लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर  उभे ठाकले होते. अशातच डीबी पथक प्रमुख माधव शिंदे यांनी तपासाची सूत्रे हाती घेत अवघ्या काही तासांतच घटनेचा उलगडा करीत खुन्याला अटक केली. सपोनी माधव शिंदे यांनी आव्हानात्मक ठरलेल्या खुनाच्या या रहस्यमय घटनेचा जलद तपास करीत आरोपीला गजाआड केले. विविध अँगलने तपास करीत त्यांनी खून करून पसार झालेल्या हिंगोली जिल्ह्यातील तरुणाला मोठ्या शिताफीने अटक केली. विनोद रंगराव शितोळे (25) रा. शीरोळी ता. वसमत जि. हिंगोली असे या पोलिसांनी अटक केलेल्या खुण्याचे नाव आहे. 

शहरातील कृष्णा अपार्टमेंट मध्ये पहिल्या माळ्यावर किरयाने रहात असलेल्या प्रिया रेवानंद बागेसर उर्फ आरोही वानखेडे (25) या तरुणीचा बंद खोलीत मृतदेह आढळून आला. तिचा दोन ते तिन दिवसांपूर्वीच खून करण्यात आल्याने मृतदेह कुजण्यास सुरुवात झाली होती. फ्लॅट मधून दुर्गंधी येऊ लागल्याने घर मालक राकेश दुबे यांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून कुलूपबंद दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला असता आतमधील दृश्य पाहून पोलिसही चक्रावले. तरुणीचा कुजण्यास सुरुवात झालेला मृतदेह पोलीसांना त्या बंद खोलीत आढळला. अर्धनग्न अवस्थेत तरुणीचा मृतदेह आढळल्याने शहरात एकच खळबळ माजली. कुजलेल्या अवस्थेतील मृतदेहाची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. तरणीची दोन वेगवेगळी नावे पोलिसांसमोर आली. अशातच पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांची माहिती मिळवत तिच्या आईला घटनेची माहिती दिली. पश्चात तिच्या खऱ्या नावाचा उलगडा झाला. प्रिया रेवानंद बागेसर उर्फ आरोही वानखेडे रा. बोर्डा ता. वरोरा असे तरुणीचे नाव असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. तिच्या डोक्यावर मागून वजनदार वस्तूने मारल्याचे तथा तिच्या गळ्यावर खुणा आढळून आल्याने पोलीसांना तिचा खून झाल्याची खात्री पटली. युवतीच्या या रहस्यमय खुनाचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले होते. गुन्ह्याच्या तपासाची सूत्रे गुन्हे शोध पथकाकडे येताच त्यांनी जलद गतीने तपासाची चक्रे फिरविली. विविध अँगलने तपास करीत अवघ्या काही तासांतच पोलिसांनी खुनाच्या रहस्यावरून पडदा उठविला. खुनाच्या या घटनेचा कौशल्यपूर्ण तपास करून अवघ्या काही तासांतच डिबी पथकाने आरोपीचा शोध लावून त्याला बेड्या ठोकल्या. विनोद रंगराव शितोळे रा. शिरली ता. वसमत जि. हिंगोली या खून करून पसार झालेल्या आरोपीला मोठ्या शिताफीने पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंद खोलीत युवतीचा मृतदेह आढळल्यानंतर तिचा खून झाल्याचे तिच्या शरीरावरील जखमांवरून स्पष्ट झाले. पण खुनाचा कोणताही अँगल समोर आलेला नसतांनाही अतिशय कौशल्यपूर्ण पद्धतीने तपास करीत सापोनी माधव शिंदे यांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. अवघ्या काही तासांतच या रहस्यमय घटनेचा उलगडा करीत आरोपीला जेरबंद केल्याने पोलिसांच्या तपासाची प्रशंसा केली जात आहे.

आरोपी विनोद शितोळे हा ट्रक ड्रायव्हर असून तो वणी येथीलच एका कोळसा वाहतूकदारांकडे चालक म्हणून कमला होता. 26 मे ला तो पत्नीला दवाखान्यात न्यायचे कारण सांगून सुटी मागून गेला तो परतलाच नाही. आरोपी विनोद हा मृतक युवती ही त्याची पत्नी असल्याचे सांगायचा. तिच्या सोबतच त्याचे वास्तव्य होते. त्या दोघांमधील नातं नेमक काय होतं व ते टोकाला कसं काय गेलं ते पोलिस तपासात निष्पन्न होईलच. तरुणीचा खून करण्याइतपत त्यांच्यात काय बिनसलं हे पोलिस तपासातून लवकरच समोर येणार आहे. पण हे रिलेशन ठेवतांना तरुणीला नाहक आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे रिलेशनशिप ठेवतांना सतर्कता बाळगण्याची गरज असल्याचे समोर आले आहे. 

सदर कार्यवाही एडिपिओ गणेश केंद्रे, ठाणेदार प्रदीप शिरास्कर यांच्या मार्गदर्शनात डीबी पथक प्रमुख माधव शिंदे व डीबी पथकाने केली. पुढील तपास सपोनि माधव शिंदे करीत आहे.

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी