Latest News

Latest News
Loading...

दहावीच्या परीक्षेतही मुलीच ठरल्या अव्वल, वणी विभागाचा ८९.९७ टक्के निकाल, चार शाळांनी दिला १०० टक्के निकाल

प्रशांत चंदनखेडे वणी 

महाराष्ट्र राज्य शिक्षण बोर्डाच्या माध्यमिक शालांत परिक्षेचे (एसएससी) ऑनलाईन निकाल आज २ जूनला जाहीर करण्यात आले. बारावी प्रमाणेच दहावीच्या परीक्षेतही मुलींनीच बाजी मारली. मुलांपेक्षा मुलींचेच उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अधिक असून गुणवत्ता यादीतही मुलीच झळकल्या आहेत. वणी तालुक्यातूनही मुलीच अव्वल आल्या आहेत. राज्य शिक्षण बोर्डाने जाहीर केलेल्या १० वी च्या निकालात मुलांपेक्षा मुलीच सरस ठरल्या आहेत. यावर्षी अमरावती विभागाचा दहावीचा निकाल ९३.२२ टक्के एवढा लागला आहे. राज्याच्या टक्केवारीत अमरावती विभाग हा सहाव्या क्रमांकावर राहिला आहे. अमरावती विभागात यवतमाळ जिल्ह्याचा सर्वात कमी म्हणजेच ९१.४९ टक्के एवढा निकाल लागला आहे. यावर्षी दहावीच्या निकालात यवतमाळ जिल्हा माघारला आहे. जिल्ह्यात वणी विभागाचा निकाल ८९.९७ टक्के लागला आहे. यात चार शाळांनी १०० टक्के निकाल देण्याचा बहुमान मिळविला आहे. 

वणी विभागातून यावर्षी २४२५ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. यात २१८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर तिन विद्यार्थिनींनी तालुक्यात अव्वल येण्याचा मान मिळविला आहे. लॉयन्स इंग्लिश मिडीयम हायस्कुलची जान्हवी संजय पांडे ही विद्यार्थिनी ९५.६० टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम आली. तर वणी पब्लिक स्कुलची हिमानी निलेश चचडा ही ९५.४० टक्के गुण मिळावीत तालुक्यात दुसरी आली आहे. तसेच लॉयन्स स्कुलची निधी श्रीनिवास येनगंटीवार व जनता शाळेची हर्षा विनोद ठमके या दोन्ही विद्यार्थिनींनी ९५.२० टक्के समान गुण मिळवून तालुक्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे. शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयाची प्राची विवेक देठे ही विद्यार्थिनी ९४.८० टक्के गुण मिळवून शाळेतून पहिली आली आहे. वणी विभागातून संताजी इंग्लिश मिडीयम स्कुल, राजश्री शाहू महाराज विद्यालय, वणी पब्लिक स्कुल, भास्कर ताजने विद्यालय कळमना या शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. मुलींनी गुणवत्तेचे शिखर गाठत तालुक्यात अव्वल येण्याचा मान मिळविला आहे. पहिल्या पाच क्रमांकापर्यंत मुलीच अव्वल ठरल्या आहेत. 

No comments:

Powered by Blogger.