क्रीष्णा अपार्टमेंट मधील खोलीत आढळला युवतीचा अर्धनग्न मृतदेह, घातपाताचा वर्तविला जात आहे संशय
प्रशांत चंदनखेडे वणी
वणी :- वणी घुग्गुस मार्गावरील शिव मंदिरापासून जवळच असलेल्या क्रिष्णा अपार्टमेंट मधील एका खोलीत चोवीस वर्षीय युवतीचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ माजली आहे. आज 29 मे ला सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या युवतीचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. रूम मधून दुर्गंधी येऊ लागल्याने घर मालकाने याबाबत पोलीसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून खोलीची पाहणी केली असता ही खळबळजनक घटना उघडकीस आली. आरोही वैभव बारस्कर (२४) व आरोही वानखडे अशी दोन नावे असलेली आधारकार्ड मृतक युवती जवळ आढळून आल्याने तिचे माहेरचे नाव कोणते व सासरचे कोणते हा संभ्रम निर्माण झाला असून तिचे कुटुंबीय आल्यानंतरच तिच्या नावाची स्पष्टता होईल. ही युवती वर्धा जिल्ह्यातील समुद्रपुर तालुक्यातील निंबी या गावची रहिवासी असल्याचे प्रथम दर्शनी समोर आले आहे. युवतीचा मृतदेह संशयास्पद रित्या आढळून आल्याने घातपाताची शक्यता वर्तविली जात आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे.
शहरातील क्रीष्णा अपार्टमेंट मधील राहत्या घरी एका युवतीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे. घरमालकाला खोलीतून दुर्गंधी येऊ लागल्याने त्यांनी याबाबत पोलीसांना माहिती दिली. पोलिसांनी खोलीची पाहणी केली असता तेथे एका युवतीचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळून आला. या युवतीचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. अपार्टमेंटमध्ये दुर्गंधी पसरल्याने या घटनेचा उलगडा झाला. या युवतीचा मृत्यू नेमका कशाने झाला हे अद्याप गुलदस्त्यात असून संशयास्पद स्थितीत तिचा मृतदेह आढळल्याने घातपाताची शक्यता वर्तविली जात आहे. युवतीच्या मृत्यूचे गूढ उलगडण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकले आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.
Comments
Post a Comment