वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी

प्रशांत चंदनखेडे वणी 

मालवाहू वाहनाला झालेल्या भीषण अपघातात वाहनातून प्रवास करणारी एक महिला मृत्युमुखी पडली तर वाहन चालकासह इतर आठ प्रवासी जखमी झाल्याची घटना शिरपूर मार्गावरील नदीच्या पुलाजवळ सोमवार दि. ३ फेब्रुवारीला सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली. सुमन वासुदेव नागपुरे (५५) रा. शिरपूर ता. वणी असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. जखमींपैकी एका महिलेचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. याबतात पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी वाहन चालक संदीप पंढरी काकडे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

शिरपूर येथील रहिवाशी असलेल्या शेतमजूर महिला पुरड (पुनवट) येथून शिरपूरला जाण्याकरिता टाटा एस (छोटा हाथी MH ३४ BG ३९९७) या मालवाहू वाहनात बसल्या. वाहन चारगाव चौकी वरून वळण घेत शिरपूरकडे जात असतांना नदी वरील पुलापासून काही अंतरावर वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व वाहन रस्त्याच्या कडेला खोलगट भागात उतरले. रस्त्याच्या कडेला असलेल्या राजू बोदाडकर यांच्या शेताजवळ उतरलेले हे वाहन नाल्याच्या काठावरील एका झाडाला अडकले. या अपघातात मालवाहू वाहनाने प्रवास करणारे सर्वच प्रवासी जखमी झाले. तसेच वाहन चालकही जखमी झाला. अपघाताची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना अति शीघ्र रुग्णालयात हलविले. मात्र जखमींपैकी एका महिलेच्या छातीला व डोक्याला जबर मार लागल्याने तिला चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले. चंद्रपूर येथे उपचार सुरु असतांना सुमन नागपुरे या महिलेचा मृत्यू झाला. तर एका महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते. इतर प्रवाशांना किरकोळ मार लागल्याने त्यांना प्राथमिक उपचारानंतर सुटी देण्यात आली. 

शिरपूर येथील मजूर महिला पुरड येथे मजुरीला जायच्या. त्यांना ने-आन करणारा ऑटो ठरला होता. परंतु ३ फेब्रुवारीला ऑटो चालकाचा कापूस विक्रीसाठी न्यायचा असल्याने हे सर्व मजूर दुसऱ्या वाहनाने गेले. शेतातील कामे आटोपल्यानंतर सायंकाळी शिरपूरला परततांना हे सर्व मजूर एका मालवाहू वाहनात बसले. दरम्यान नदीच्या पुलापासून काही अंतरावर वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व वाहन रस्त्याच्या कडेला खोलगट भागात उतरले व एका झाडाला अडकले. यात सुमन नागपुरे या मजूर महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर रुचिता महेश बारसागळे (३५), वंदना सुधाकर वालकोंडे (५५), छाया राजेश दरकंटीवार (४५), मंगला राजू नागपुरे (४०), पर्वता वसंता नागपुरे (५०), वंदना राजू निब्रड (४८), मंगला चंपत सुरतेकर या महिला जखमी झाल्या. यापैकी एका महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. याबतात महेश विठ्ठल बारसागळे (४१) रा. शिरपूर यांनी पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी टाटा एस चालक संदीप पंढरी काकडे (३५) रा. शिरपूर याच्यावर बीएनएसच्या कलम 106(1), 281, 125(A), 125(B) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार माधव शिंदे यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहे.   

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय