Latest News

Latest News
Loading...

ऑल इंडिया स्केटिंग स्पर्धेत वणीचे खेळाडू चमकले, सानवी शिंदे हिला मिळाले दोन सुवर्ण व एक रौप्य पदक

प्रशांत चंदनखेडे वणी 

छत्रपती संभाजी नगर येथे घेण्यात आलेल्या ऑल इंडिया रिले स्केटिंग स्पर्धेत वणी येथील सानवी माधव शिंदे या हुरहुन्नरी मुलीने आपल्या खेळाडूवृत्तीचं दर्शन घडवित दोन सुवर्ण व रौप्य पदक प्राप्त केलं आहे. आपल्या कौशल्यपूर्ण खेळाच्या जोरावर या बाल क्रीडापटूने स्पर्धेत आपली चमक दाखविली आहे. मैदानी खेळात रुची ठेवणाऱ्या या आठ वर्षाच्या मुलीने आपल्या आंतरिक गुणांचा अविष्कार घडवीत राष्ट्रीय दर्जाची स्पर्धा गाजविली. जिद्द, चिकाटी व आत्मविश्वासाच्या बळावर तिने आठ वर्ष वयोगटात उत्तम खेळ करीत तीन पदकं प्राप्त केली. सानवी हिच्या चिवट खेळीने सर्वच भारावून गेले. तिने स्केटिंग स्पर्धेत दैदिप्यमान कामगिरी करीत आपल्या खेळाडूवृत्तीचा परिचय दिला आहे. तिच्यातही एक उत्तम खेळाडू दडला असल्याचं तिने केलेल्या कामगिरीवरून सिद्ध झालं आहे. राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत अलौकिक खेळाचं सादरीकरण करीत तिने क्रीडा क्षेत्रात आपलं नाव कोरलं आहे. या स्पर्धेत वणीच्या स्पर्धकांनी उत्कृष्ठ खेळ करीत दुसरा क्रमांक पटकावला आहे. छत्रपती संभाजी नगर येथील स्पर्धक प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. त्यांनी या स्पर्धेचा मनाचा चषक पटकावला.

रोलर रिले स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया व रोलर रिले स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजी नगर येथील विभागीय क्रीडा संकुल येथे ऑल इंडिया रोलर रिले स्केटिंग छत्रपती चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विविध जिल्ह्यातील १५० स्पर्धकांनी भाग घेतला होता. ही स्पर्धा १२ वर्षावरील, १२ वर्षाखालील. ८ वर्षावरील व ८ वर्षाखालील वयोगटात घेण्यात आली. यात ८ वर्ष वयोगटात सानवी माधव शिंदे या स्पर्धक मुलीने आपल्या कौशल्याची चुणूक दाखवीत उत्कृष्ठ खेळ सादर केला. तिने खेळाचे मैदान गाजवीत या स्पर्धेत आपल्या नावाची छाप सोडली. या राष्ट्रीय स्तरावरील स्केटिंग स्पर्धेत तिने उत्तम खेळ करीत दोन सुवर्ण व एक रौप्य पदक प्राप्त केलं. सानवी ही पोतद्दार शाळेची विद्यार्थिनी असून एपीआय माधव शिंदे यांची मुलगी आहे. तिने स्पर्धेत मिळविलेल्या यशाबद्दल तिचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. सानवी हिने जिद्द व कौशल्याच्या बळावर ही स्पर्धा गाजवत तीन पदकं प्राप्त केली आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या वणी येथील खेळाडूंनी उत्तम खेळ करीत दुसरा क्रमांक पटकावला आहे. ऑल इंडिया रिले स्केटिंग स्पर्धेत वणी येथील खेळाडूंनी खेळाडूवृत्तीचं दर्शन घडवीत मिळविलेल्या यशाने वणीला आणखी एक बहुमान मिळाला आहे. 

No comments:

Powered by Blogger.