Latest News

Latest News
Loading...

प्रतिभाही झळकली प्रतिभावंतांच्या यादीत, राजूर या गावाचा पुढे रेटला वारसा


प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी शहरालगत असलेल्या राजूर कॉलरी या प्रतिभावंत व्यक्तिमत्व घडविणाऱ्या गावातील रहिवासी असलेल्या प्रतिभा प्रकाश तालावार या विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेत ८६.४० टक्के गुण घेऊन प्रतिभावंतांच्या यादीत आपलं नाव लिहिलं आहे. लॉयन्स इंग्लिश मिडीयम स्कुलची विद्यार्थिनी असलेली प्रतिभा तालावार ही गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांच्या यादीत झळकाल्याने राजूर या गावाच्या नावलौकिकात आणखीच भर पडली आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या एसएससी बोर्डाच्या परीक्षेचे नुकतेच निकाल जाहीर करण्यात आले. या परीक्षेत यशाचे शिखर गाठलेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रतिभा तालावार हे देखील एक नाव समोर आलं आहे. प्रतिभा तालावार या विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेत ८६.४० टक्के गुण मिळवून राजूर या गावाचे नाव उंचाविले आहे. 

राजूर हे प्रतिभावंत व्यक्तिमत्वांचं गाव म्हणून ओळखलं जातं. अनेक गुणसंपन्न व्यक्तिमत्व या गावात निपजले आहेत. विविध क्षेत्रात राजूर हे गाव नावाजलेलं असून अनेक प्रतिभाशाली व्यक्ती या गावात घडले आहेत. चळवळीचं गाव म्हणूनही राजूर या गावाची ख्याती आहे. या गावातील अनेक विद्यार्थ्यांनी यशस्वी भरारी घेतली आहे. येथील बरेच विद्यार्थी उच्च पदांवर विराजमान असून यशस्वी जीवन जगत आहेत. प्रतिभावंत व्यक्तिमत्व घडविणारं व कलावंतांचं गाव म्हणूनही राजूर हे गाव ओळखलं जातं. याच गावातील प्रतिभा तालावार या विद्यार्थिनीने प्रतिभावंतांचा वारसा पुढे नेत शैक्षणिक जीवनात यशस्वी पायाभरणी केली आहे. तिने दहावीच्या परीक्षेत ८६.४० टक्के गुण मिळवून शिक्षणात उभारी घेतली आहे. प्रतिभा हिचे वडील प्रकाश तालावार हे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. त्यांचंही तिला वेळोवेळी मार्गदर्शन मिळालं. प्रतिभा हिने आपल्या यशाचं श्रेय्य आपले आई वडील व शिक्षकांना दिलं आहे. 

   

No comments:

Powered by Blogger.