उभ्या ट्रकला पिकअपची जोरदार धडक

प्रशांत चंदनखेडे वणी 

उभ्या ट्रकला मालवाहू पिकअपची जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात पिकअप चालक गंभीर जखमी झाल्याची घटना वणी घुग्गुस मार्गावरील वागदरा गावाजवळ आज १८ डिसेंबरला सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. करण चंदू पुंड (२५) रा. पळसोनी ता. वणी असे या अपघातात गंभीर जखमी झालेल्या पिकअप चालकाचे नाव आहे. त्याला आधी वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर त्याची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्याला चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले आहे. 

घुग्गुस कडून वणीकडे येत असलेल्या भरधाव पिकअपची (MH ३१ FC ५६२८) वागदरा गावाजवळ उभ्या असलेल्या कोळसा वाहतुकीच्या ट्रकला (MH ३४ AV २३६५) मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात पिकअप चालक गंभीर जखमी झाला आहे. धडक एवढी जोरदार होती की पिकअपचा समोरील भाग पूर्णतः क्षतिग्रस्त झाला आहे. अपघात होताच वागदरा गावातील नागरिकांनी माणुसकीचे दर्शन घडवीत पिकअपमध्ये अडकलेल्या वाहन चालकाला बाहेर काढून त्याला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले आहे. अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी शीघ्र घटनास्थळाकडे धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेतली आहे. घटनेचा पुढील तपास वणी पोलिस करीत आहे. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी