मनसेकडे वाढू लागला युवकांचा कल, तरोडा येथील युवकांचा मनसेत प्रवेश
प्रशांत चंदनखेडे वणी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांच्या कार्यतत्परतेमुळे युवकांचा कल मनसेकडे वाढू लागला आहे. राजू उंबरकर यांनी युवकांचे हित जोपासण्याचे काम केले असून अनेकांचे रोजगाराचे प्रश्न सोडविले आहेत. शेतकरी, कष्टकरी व शेतमजुरांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध त्यांनी नेहमी आवाज उठविला आहे. जनतेचे प्रश्न व समस्या सोडविण्याकरिता ते नेहमीच तत्पर असतात. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या असो की आर्थिक, त्या राजू उंबरकर यांच्या पर्यंत आल्यास त्याचं निराकरण नक्कीच झालं आहे. आर्थिक कमकुवत घटकांना त्यांनी नेहमीच मदतीचा हात दिला आहे. अनेकांचा उपचाराचा व उपजीविकेचा खर्चही त्यांनी उचलला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एसटी महामंडळाची बस सेवा उपलब्ध करून देण्यातही त्यांचं मोठं योगदान राहिलं आहे. त्यांच्या याच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कार्यांनी प्रेरित होऊन युवा वर्ग राजू उंबरकर यांच्याशी जुळू लागला आहे. काही दिवसांपूर्वी मुकुटबन व आसपासच्या गावातील नागरिकांनी मनसेत मोठ्या संख्येने प्रवेश घेतला होता. तर आता तरोडा येथील युवकांनी राजू उंबरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन मनसेत जाहीर प्रवेश केला आहे. शिवमुद्रा या त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी अनेक युवकांनी स्वेच्छेने मनसेचा झेंडा आपल्या खांद्यावर घेतला.
राजू उंबरकर यांच्या जनकार्यामुळे नागरिकांचा मनसेकडे ओघ वाढला आहे. राजू उंबरकर यांच्या खंबीर नेतृत्वामुळे नागरिक मनसेकडे वळू लागले आहेत. पक्षात सातत्याने नागरिकांचा प्रवेश सुरु आहे. आगामी काळात पक्ष संघटन भक्कम करण्याच्या दृष्टीने हे पक्ष प्रवेश महत्वाचे ठरणार आहे. राजू उंबरकर यांनी पक्ष बांधणी करण्यावर नेहमी भर दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची लोकप्रियता त्यांनी वाढविली आहे. पक्षाचा अजेंडा त्यांनी गावागावात पोहचविला आहे. पक्षाच्या धेय्य धोरणांवर कार्य करीत त्यांनी अन्यायाविरुद्ध नेहमी आवाज उठविला आहे. नागरिकांचे प्रश्न सोडविण्याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच कटिबद्ध राहणार असल्याची भूमिका त्यांनी या पक्ष प्रवेश सोहळ्यातही स्पष्ट केली आहे. यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, माजी नगर सेवक राजू डफ यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment