आशा बियरबारमध्ये तरुणांच्या दोन गटात राडा, मद्यपींच्या हुडदंग घालण्याने परिसरातील नागरिक आले धास्तीत


प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी वरोरा मार्गावरून गौरकार कॉलनीकडे जाणाऱ्या वळण रस्त्यावर रहिवाशी वस्तीलगत असलेल्या आशा बियरबारमध्ये तरुणांच्या दोन गटात तुफान राडा झाला. दोनही गटातील तरुणांनी एकमेकांना प्रचंड मारहाण केली. एवढेच नाही तर काचेचे ग्लास एकमेकांवर भिरकावण्यात आले. काचेचा ग्लास लागल्याने एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु असल्याचे सांगण्यात येते. रक्तबंबाळ अवस्थेतच त्याला त्याच्या मित्रांनी रुग्णालयात दाखल केले. ही फिल्मी स्टाईल हाणामारी बार मधील तिसऱ्या डोळ्यात कैद झाल्याचे सांगण्यात येत आहे. टपोरी तरुणांच्या या भाईगिरीमुळे शहरातील शांतता भंग होतांना दिसत आहे. शुल्लक वादातून एकमेकांवरील राग मनात धरून ठेवण्याचे प्रमाण फारच वाढले आहे. शुल्लक कारणांवरून वाद झाला की आपल्या साथीदारांना बोलावयाचे आणि आपला जोर आजमावायचा हा प्रकार आता खूपच वाढला आहे. तरुणांच्या या राड्यालाही जुन्या वादाची किनार असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. आशा बारमध्ये मद्य सेवन करणारे मद्यपी कधी बारमध्ये तर कधी बारच्या बाहेर नेहमी धिंगाणा घालत असल्याने येथील रहिवाशी कमालीचे त्रस्त झाले आहेत. काही दिवसांपूर्वी आशा बारमध्ये दारू ढोसलेल्या तरुणांनी परिसरातीलच एका इसमाशी वाद घालत दोन तरुणांना बेदम मारहाण केली होती. त्यातील एक तरुण गंभीर जखमी झाला होता. मद्यापींच्या धिंगाणा घालण्यामुळे आशा बार हे नेहमीच चर्चेत राहतांना दिसतं.  

नागरिकांच्या निवास्थानाजवळ असलेल्या आशा बारमध्ये मद्य सेवन करण्याकरिता आलेल्या तरुणांच्या दोन गटात तुफान हाणामारी झाली. एकमेकांना प्रचंड मारहाण करतांनाच त्यांनी एकमेकांवर काचेचे ग्लास भिरकावले. काचेचा ग्लास लागल्याने एक तरुण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येते. रक्तबंबाळ अवस्थेतच त्याच्या मित्रांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. हा राडा नेमका कशामुळे झाला हे समजू शकले नाही. परंतु या राड्याला जुन्या वादाची किनार असल्याचे बोलल्या जात आहे. बियरबारमध्ये युवकांची फिल्मी स्टाईल फायटिंग सुरु असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. परंतु दोन्ही गटातील तरुण आपल्याच गुर्मीत होते. ते पोलिसांना काही एक सांगण्यास तयार नव्हते. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत काही तरुणांवर गुन्हे दाखल केले आहे. आशा बियरबारमध्ये झालेला हा राडा तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे सांगण्यात येत आहे. कधी काळी शांत असलेल्या या शहरात आता भाईगिरी वाढली आहे. एकमेकांवर जोर आजमावण्याकरिता आपल्या साथीदारांना बोलावून राडे केले जात आहे. टोळक्याने येऊन एकमेकांना मारहाण करण्याच्या घटना आता नित्याच्याच झाल्या आहेत. कधी प्रकरणं पोलिस स्टेशनपर्यंत येतात. तर कधी आपापसातच मिटविले जातात. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास तरुणांचे हे टोळके शहरातील शांतता भंग केल्याशिवाय राहणार नाही. 

अगदीच नागरिकांच्या घराजवळ बार सुरु करण्याला परवानगी देण्यात आली. गौरकार ले-आऊट परिसरात हे बार सुरु करण्यात आले. बार सुरु करण्याला नाहरकत प्रमाणपत्र देतांना घराजवळील नागरिकांच्या नाहरकत प्रमाणपत्रावर स्वाक्षऱ्या देखील घेण्यात आल्या नसल्याचे सांगण्यात येते. बारच्या अगदीच समोर तुडविले यांचे शिकवणी वर्ग होते. तेथे शाळकरी विद्यार्थी शिकवणी वर्गाकरिता यायचे. परंतु बार सुरु झाल्याने त्यांना शिकवणी वर्ग बंद करावे लागले. नियम व निकष न पाहता बियरबार सुरु करण्याला तडक परवानगी व परवाना देण्यात येत आहे. 

आशा बारमध्ये दारू पिणाऱ्या मद्यपींचा रात्री उशीरापर्यंत धिंगाणा सुरु असतो. मद्याच्या नशेत जोरजोरात अश्लील भाषेत बोलले जाते. नागरिकांच्या घरासमोरच लघुशंका केली जाते. नागरिकांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या मधोमध वाहने उभी केली जातात. वाहने हटविण्यास संगितले तर परिसरातील नागरिकांशीच अरेरावी केली जाते. मद्यपींच्या अरेरावीमुळे परिसरातील नागरिक आता कमालीचे धास्तीत आले आहेत. महिलांचे तर या रस्त्याने जाणे येणे करणे कठीण झाले आहे. अक्षता वाटल्यागत बारचे परवाने देण्यात येत आहे. नागरिकांच्या घरांसमोरही बार सुरु करण्याची परवानगी दिली जात आहे. त्यामुळे शासनाचं हे मद्य धोरण नागरिकांची डोकेदुखी वाढविणारं ठरू लागलं आहे. वणी तालुक्याने तालुकास्तरावरील बियरबार व बियर शॉपीचा विक्रम गाठला आहे. परंतु तरीही तालुक्यात बारचे परवाने वाटणे मात्र थांबलेले नाही. मुक्काम पोष्ट वणी, बियरबारच्या बाजूला हा पोस्टल ऍड्रेस आता नागरिकांचा झाला आहे. लोकवस्तीपासून दूर बियरबार असणे गरजेचे असतांना नागरिकांच्या घराजवळ बियरबार सुरु करण्याची परवानगी देण्यात आल्याने परिसरातील नागरिकांमधून कमालीचा रोष व्यक्त होतांना दिसत आहे..  

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी