दहावीतील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थिनीच्या हस्ते करण्यात आले ग्रामपंचायतीच्या राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण
प्रशांत चंदनखेडे वणी
तालुक्यातील खांदला ग्रामपंचायत ही लोकहिताचे उपक्रम राबविणारी ग्रामपंचायत म्हणून नावारूपास येऊ लागली आहे. लोककल्याणकारी उपक्रमांना चालना देणारी ग्रामपंचायत म्हणूनही खांदला ग्रामपंचायत ओळखली जाऊ लागली आहे. अनेक आगळे वेगळे उपक्रम या ग्रामपंचायतेच्या माध्यमातून राबविण्यात आले आहे. असाच एक अनोखा उपक्रम या ग्रामपंचायतने सुरु केला असून तो १५ ऑगस्ट व २६ जानेवारीला काटेकोरपणे राबविला जात आहे. दहावी व बारावीतील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थिनींना ग्रामपंचायत कार्यालयातील राष्ट्रीय ध्वजाच्या ध्वजारोहणाचा मान देऊन त्यांना गौरविण्याचा आगळा वेगळा उपक्रम ग्रामपंचायतेने हाती घेतला आहे. स्वातंत्र्य दीना निमित्त राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण दहावीतील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थिनीच्या हस्ते करण्यात आले. जान्हवी हरिदास ताजने या विद्यार्थिनीच्या हस्ते यावर्षी खांदला ग्रामपंचायतेतील राष्ट्रीय ध्वजाचे ध्वरोहण करण्यात आले. ही विद्यार्थिनी १० वी च्या परीक्षेत ९० टक्के गुण घेऊन गुणवत्ता यादीत झळकली होती. ग्रामीण भागातील मुलींमध्येही शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, व त्या गुणवत्ता यादीत झळकाव्या या उद्देशाने ग्रामपंचायतेने हा वैशिट्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. देशभरात आज उत्साहाच्या वातावरणात स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला. तालुक्यातील खांदला ग्रामपंचायत येथेही स्वातंत्र्य दीना निमित्त कार्यक्रम घेण्यात आला. ग्रामपंचायतेतील राष्ट्रीय ध्वजाच्या ध्वजारोहणाचा मान यावर्षी दहावीतील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थिनी जान्हवी ताजने हिला देण्यात आला. यावेळी सरपंच हेमंत गौरकार यांच्यासह ग्रामपंच्यायतेचे सर्व सदस्य, गावकरी व मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
Comments
Post a Comment