स्वातंत्र्य दिनी गरजू विद्यार्थ्यांना स्कुल बॅगचे वाटप, संजय खाडे यांनी राबविला सामाजिक उपक्रम
प्रशांत चंदनखेडे वणी
शहरातील सहकारी क्षेत्रात यशस्वी वाटचाल करणाऱ्या रंगनाथ स्वामी अर्बन निधी लिमिटेड व श्री लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मारेगाव येथील राष्ट्रीय विद्यालय तथा विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना स्कुल बॅगचे वाटप करण्यात आले. रंगनाथ स्वामी निधी अर्बन लि. चे अध्यक्ष संजय खाडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना स्कुल बॅग वाटप करण्यात आल्या. यावेळी रंगनाथ स्वामी निधी अर्बन लि. चे संचालक ईश्वर खाडे, श्री लक्ष्मी नारायण पतसंस्थेचे संचालक धनंजय खाडे, पद्माकर एकरे, बी.एम. मोरे हे प्रामुख्याने उपस्थित होते. शिक्षण उपयोगी साहित्याचे वाटप करून अशा प्रकारचा सामाजिक उपक्रम राबविण्यात आल्याने विद्यालया कडून अध्यक्ष व संचालकांचे अभिनंदन करण्यात आले. स्वातंत्र्य दिनी गरजू विद्यार्थ्यांना स्कुल बॅगचे वाटप करून संजय खाडे यांनी स्तुत्य उपक्रम राबविला. राष्ट्रीय विद्यालय तथा विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित या स्कुल बॅग वितरण सोहळ्याला विद्यालयातील शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी तथा पतसंस्थेचे कर्मचारी अनुराग आयतवार, प्रतिक गेडाम, सुहास लांडे, खुशाल महातळे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment