मदतनीस भरती प्रक्रियेतील घोळ व तेंदू मजुरांना बोनस न मिळाल्याने लढा ही संघटना झाली आक्रमक
जनतेच्या न्याय्य, हक्कांसाठी लढणाऱ्या लढा या संघटनेने शासन व प्रशासनाच्या अन्यायकारक धोरणांविरुद्ध सतत आवाज उठविला आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठविणारी संघटना म्हणून लढा या संघटनेकडे पाहिलं जात आहे. अंगणवाडी मदतनीस पदभरती प्रक्रियेतील प्राथमिक गुणवत्ता यादीत झालेला घोळ या संघटनेने चव्हाट्यावर आणून ती यादी नव्याने बनवून प्रकाशित करण्याची मागणी करतांनाच गुणवत्ता यादी नव्याने जाहीर न केल्यास बेमुद्दत उपोषणाला बसण्याचा अल्टिमेटमच प्रशासनाला दिला आहे. नुकताच या संघटनेने तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांचा प्रश्न उचलला आहे. तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांना मिळणारे बोनस वर्ष लोटूनही अद्याप मिळाले नसल्याने लढा ही संघटना प्रशासनाच्या अन्यायकारक धोरणाविरुद्ध आक्रमक झाली आहे. तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांवरील अन्याय खपवून घेतला जाणार नाही, ही स्पष्ट भूमिका लढा या संघटनेने जाहीर करीत वन परिक्षेत्र विभागाला (प्रादे.) निवेदन देऊन बोनसची रक्कम तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांच्या खात्यात त्वरित जमा करण्याची मागणी केली आहे.
वणी विधानसभा क्षेत्रातील जनतेच्या न्याय्य हाकांसाठी पुढाकार घेऊन शासन प्रशासनाच्या अन्यायकारक धोरणांविरुद्ध आवाज उठविणाऱ्या धेय्यवादी युवकांनी एकत्र येत लढा ही संघटना उभारली आहे. या संघटनेने सतत अन्यायकारक धोरणांवर प्रहार केला आहे. नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी ही संघटना प्रखरतेने पुढे आली आहे. नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा या संघटनेने प्रसंगी आक्रमक भूमिका देखील घेतली आहे. वणी तालुक्यात पंचायत समिती अंतर्गत राबविण्यात येणारी अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रिया पारदर्शक व्हावी, याबाबत आधीच लढा या संघटनेने प्रशासनाला विनंती अर्ज सादर केला होता. परंतु त्यानंतरही भरती प्रक्रिया राबवितांना मोठा घोळ करण्यात आला आहे. मदतनीस भरती प्रक्रियेची प्राथमिक गुणवत्ता यादी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली. त्यात परिशष्ट 'ब' मध्ये मोठा घोळ झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर लढा ही संघटना आक्रमक झाली. प्रशासनाने जाहीर केलेली प्राथमिक गुणवत्ता यादी नव्याने बनवून २१ ऑगस्ट पर्यंत प्रकाशित न केल्यास २३ ऑगस्ट पासून या बोगस भरती प्रक्रिये विरोधात तहसील कार्यालयासमोर बेमुद्दत उपोषला बसण्याचा इशारा लढा या संघटनेने जिल्हा उप कार्यकारी अधिकारी (बालकल्याण) यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
लढा ही संघटना तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांच्या प्रश्नाला घेऊनही आक्रमक झाली आहे. तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा या संघटनेने आवाज उठविला आहे. तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांना सन २०२२ चे तेंदू संकलन बोनस अद्यापही मिळाले नाही. वणी वन परिक्षेत्र विभाग (प्रादे.) अंतर्गत दरवर्षी आपल्या क्षेत्रातील जंगल परिसरात मजुरांकडून तेंदूपत्ता संकलन करण्यात येते. तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांना त्यानुसार रोजी देण्यात येते. पण त्यांना बंडल प्रमाणे मिळणारे बोनस वर्ष लोटले तरी अद्यापही मिळाले नाही. वणी शहरासह तालुक्यातील तेंदू घटक क्र. २ सुकणेगाव, घटक क्र. ३ कुर्ली व घटक क्र. ४ वणी येथील जंगल परिसरात मजुरांकडून मोठ्या प्रमाणात तेंदू संकलन करण्यात येते. त्यांना प्रत्येक बंडल मागे एक रुपया बोनस देण्याची तरतूद असतांना मागील वर्षीचे तेंदू संकलन बोनस अद्यापही या मजुरांना मिळाले नाही. ते लवकरात लवकर या मजुरांच्या खात्यात जमा करण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी ताठर भूमिका लढा या संघटनेने वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून मांडली आहे. नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी लढा देणाऱ्या प्रवीण खानझोडे, अजय धोबे, ऍड. रुपेश ठाकरे, विकेश पानघाटे, राहुल झट्टे यांनी अन्यायग्रस्त नागरिकांना सोबत घेऊन शासन व प्रशासनाच्या अन्यायकारक धोरणांविरुद्ध आवाज उठविला आहे.
Comments
Post a Comment