मारेगाव (कोरंबी) येथील विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठीचा प्रवास फाल्गुन गौरकार यांनी केला सुलभ

 

प्रशांत चंदनखेडे वणी 

तालुक्यातील मारेगाव (कोरंबी) येथील विद्यार्थ्यांना वणी येथे शिक्षणासाठी करावा लागणारा प्रवास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गौरकार यांनी सुलभ करून दिला आहे. विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळेवर बस उपलब्ध नसल्याने त्यांच्या शैक्षणिक प्रवासात मोठे अडथळे निर्माण होत होते. बस सुविधेअभावी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असल्याची गंभीर बाब फाल्गुन गौरकार यांच्या समोर येताच त्यांनी विद्यार्थ्यांना घेऊन सरळ वणी आगार प्रमुखांचं कार्यालय गाठलं. विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळेवर बस उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी एसटी महामंडळाच्या वणी आगार प्रमुखांना निवेदन दिलं. त्यांच्या निवेदनाची दखल घेत आगार प्रमुखांनी सोमवार पासून शाळेच्या वेळेवर बस उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्याने विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रवास आता सुलभ होणार आहे. 

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाकरिता वणी येथे यावे लागते. गाव खेड्यातून शहरात शिक्षणाकरिता येणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता बस सेवा उपलब्ध नसल्याने त्यांना शाळेत जाणे येणे करतांना मोठ्या अडचणी निर्माण होत आहे. बस सेवा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात मोठे अडथळे निर्माण होत आहे. मारेगाव (कोरंबी) येथील विद्यार्थ्यांचेही बससेवे अभावी शैक्षणिक नुकसान होत असल्याची बाब फाल्गुन गौरकार यांच्या निदर्शनास येताच त्यांनी विद्यार्थ्यांना घेऊन सरळ वणी आगार प्रमुखांच्या कार्यालयातच धडक दिली. शाळेच्या वेळेवर बस उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे शाळेत जाणे येणे कठीण झाल्याचे फाल्गुन गौरकार यांनी आगार प्रमुखांना पटवून दिले. मोरगाव (कोरंबी) येथील विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या वेळेवर बस उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी आगार प्रमुखांना निवेदनही दिले. त्यांच्या निवेदनाची आगार प्रमुखांनी तात्काळ दखल घेत सोमवार पासून शाळेच्या वेळेनुसार बस पाठविण्याचे आश्वासन दिल्याने विद्यार्थ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी