अस्वच्छता व अशुद्ध पाणी पुरवठ्यामुळे वाढले डेंग्यू, टायफॉईडचे आजार, शहरवासीयांना झाली मोठ्या प्रमाणात लागण

प्रशांत चंदनखेडे वणी 

सताड उघड्या असलेल्या नाल्या व त्यांची नियमित साफसफाई करण्यात येत नसल्याने नाल्या जागोजागी तुंबल्या आहेत. नाल्या तुंबल्याने त्यात घाणपाणी साचून रहात असल्याने रोगराई पसरविणाऱ्या जीव जंतूंचा प्रकोप वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना डेंग्यू व टायफॉईड (विषमज्वर) सारख्या गंभीर आजारांची मोठ्या प्रमाणात लागण होऊ लागली आहे. तसेच नाल्यांचे पाणी वाहून नेणारी गटारेही तुंबल्याने नागरिकांच्या घरासमोर घाणपाण्याचे डबके साचून रहात असल्याने परिसरात मोठी दुर्गंधी पसरली आहे. साचून राहणाऱ्या घाणपाण्यात आजार पसरविणाऱ्या जीव जंतूचे प्रजनन वाढून विषाणूजन्य आजारांमध्ये मोठी वाढ झाली आहे. तसेच परिसरात घाणीचे साम्राज्य पसरल्याने डासांचाही प्रकोप वाढला आहे. त्यातच शहरवासीयांना अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्याने नागरिक डेंग्यू व टायफॉईड सारख्या आजारांनी फणफणू लागले आहेत. मात्र नगर पालिका प्रशासन शहरात साफसफाई, धूर फवारणी व शुद्ध पाणी पुरवठा करण्याकडे सपशेल दुर्लक्ष करीत आहे. 

शहरात पसरलेली अस्वच्छता व होणाऱ्या अशुद्ध पाणी पुरवठ्यामुळे नागरिक विषाणूजन्य आजारांना बळी पडू लागले आहेत. शहरात अस्वच्छता निर्माण झाली असून परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या सताड उघड्या असून त्या ठिकठिकाणी तुंबल्या आहेत. नाल्यांचे पाणी वाहून नेणारी गटारेही तुंबल्याने नागरिकांच्या घरासमोरच घाणपाण्याचे डबके साचले आहे. साचून राहणाऱ्या घाणपाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांना श्वास घेणे अवघड झाले आहे. घाणपाण्यात आजार पसरविणारे जीव जंतू उत्पन्न होऊ लागल्याने नागरिकांना विषाणूजन्य आजारांची लागण होऊ लागली आहे. परिसरात घाणीचे साम्राज्य पसरल्याने डासांचाही प्रकोप वाढला आहे. त्यातल्या त्यात शहरात अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्याने आजारांमध्ये आणखीच वाढ झाली आहे. घाण व्यवस्थेमुळे जीव जंतू व डासांचं प्रजनन वाढल्याने परिसरातील नागरिक डेंग्यू व टायफॉईड सारख्या आजारांनी फणफणत आहेत. नगर पालिकेचं शहरात स्वच्छता ठेवण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होऊ लागलं आहे. नाल्यांची साफसफाई व कचरा संकलनाअभावी नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ लागले आहे. शहरातील विठ्ठलवाडी व गौरकार कॉलनी परिसरातील तब्बल १० ते १२ जणांना डेंग्यू व टायफॉईड या गंभीर आजारांची लागण झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. नगर पालिका मात्र शहरात स्वच्छता व धूर फवारणी करण्याकडे दुर्लक्ष करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे. त्यामुळे नागरिकांमधून आता नगर पालिका प्रशासनविरुद्ध असंतोष खदखदू लागला आहे. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी