केळापूर तालुक्यातील दातपाडी गावात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा, राबविण्यात आले विविध उपक्रम
प्रशांत चंदनखेडे वणी
केळापूर तालुक्यातील दातपाडी या गावात स्वातंत्र्य दिन उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य दीना निमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये कोंघारा येथील कृषी कन्या देखील सहभागी झाल्या होत्या. जिल्हा परिषद कनिष्ठ प्राथमिक शाळेच्या शिक्षिका कविता वनकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष फुलसिंग राठोड, वनिता पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून हर तिरंगा व रुक्ष लागवड आदी उपक्रम राबविण्यात आले. यात कृषी कन्यांनी मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमांचे पूजन व हारार्पणाने झाली. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष फुलसिंग राठोड यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजाचे धजारोहण करण्यात आले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, आशा वर्कर व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून हर घर तिरंगा व वृक्ष लागवड हे उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये कृषी कन्या शर्वरी दसोडे, वैष्णवी काळे, रासेश्वरी जुमडे, सृष्टी गायमुखे, वैष्णवी कोटकर यांनी विशेष सहभाग घेतला. हे उपक्रम राबविण्यात जी.प. शाळा व गावकऱ्यांनी देखील सहकार्य केले.
Comments
Post a Comment