ग्रामीण भागातील विकासकामांचा दर्जा घसरला, रोजगार हमी, अर्धे तुम्ही नी अर्धे आम्ही, या म्हणीप्रमाणेच होत आहे गावातील विकासकामे

प्रशांत चंदनखेडे वणी 

ग्रामीण भागातील विकासकामे करतांना आर्थिक गौडबंगाल होत असल्याने ग्रामीण भागात अतिशय निकृष्ट दर्जाची कामे होतांना दिसत आहे. ग्रामीण भागात विकासकामे करतांना सर्वांचेच हित साधले जात असल्याने कामांची गुणवत्ता खालावली आहे. ग्रामपंचायते अंतर्गत मनमर्जी कामे होतांना दिसत आहे. सामान्य फंडाचा व शासनाच्या विकास निधीचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होतांना दिसत आहे. अनावश्यक कामांमध्ये निधी खर्चिला जात असून आवश्यकता असलेल्या ठिकाणी कामेच केली जात नसल्याची ओरड ग्रामवासीयांमधून ऐकायला मिळत आहे. दर्जाहीन कामांची बिले अतिशीघ्र काढून सर्वांनाच आपापला वाटा दिला जात असल्याने कुणीही कुणाची तक्रार करण्यास धजावत नाही. वणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या विरकुंड ग्रामपंचायतेच्या बाबतीतही गाववासीयांमधून हीच प्रतिक्रिया ऐकायला मिळाली. पाच गावे मिळून विरकुंड ही गट ग्रामपंचायत आहे. विरकुंड या मुख्य गावातच समस्यांचा अंबार आहे. काही भागात अजूनही सिमेंट रस्ते झाले नाही. काही ठिकाणी भूमिगत नाल्या बांधण्यात आल्या, तर काही ठिकाणी नाल्यांचा पत्ताच नाही. नाल्यांवर टाकण्यात आलेले धापे अल्पावधीतच फुटले आहेत. नाल्यांवरील मुख्य चेम्बरही फुटल्याने नाल्यांचे पाणी रस्त्यावरून वाहू लागले आहे. भूमिगत नाल्या जागोजागी तुंबल्या आहेत. नाल्यांवर टाकण्यात आलेले धापेही अतिशय निकृष्ट दर्जाची आहेत. ग्रामपंचायत समोरील नालीवरही टाकण्यात आलेले धापे निकृष्ट दर्जाचे असून ग्रामपंचायतेच्या समोरच नालीवरील चेंबर फुटले आहे. एवढेच नाही तर ग्रामपंचायतेच्या समोरच रस्त्यावरून घाणपाणी वाहतांना दिसते. मनरेगाची कामेही नवेगाव या एकाच गावात सुरु असल्याने वीरकुंड व विठ्ठल नगर येथील रहिवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. विकासकामांबाबत माहिती जाणून घेण्याकरिता ग्रामपंचायतेला भेट दिली असता ऐन स्वातंत्र्य दिनाचा महोत्सव सुरु असतांना ग्रामपंचायतेला कुलूप लागले होते. राष्ट्रीय ध्वज फडकत असतांना ग्रामपंचायतेत कुणीही जबादार व्यक्ती हजर नसल्याने स्वातंत्र्याचा महोत्सव किती गांभीर्याने घेण्यात आला, हे या निमित्ताने समोर आले. 

विरकुंड या गातील काही भागात अद्याप विकासच पोहचला नाही. काही भागात अद्याप सिमेंट रस्ते बांधण्यात आले नाही. मारोती मंदिर परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी आमच्या भागात कधी सिमेंट रस्ते बांधण्यातच आले नसल्याच्या व्यथा मांडल्या आहेत. गावातील काही भागात सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या देखील नाहीत. विरकुंड येथील काही भागात सिमेंट रस्तेच नाही, तर काही भागातील सिमेंट रस्ते हे उखडले आहेत. विठ्ठल नगर या गावातही विकासकामांची वानवा दिसून येते. विरकुंड येथील भूमिगत नाल्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. नाल्यांवरील धापे अल्पावधीतच फुटू लागले आहेत. नाल्यांवरील मुख्य चेंबरही फुटले आहे. ग्रामपंचायते समोरच नालीचे चेंबर फुटले आहे. रस्त्यावरून घाणपाणी वाहतांना दिसत आहे. भूमिगत नाल्या जागोजागी तुंबल्याचेही दिसून आले. ग्रामपंचायतेच्या माध्यमातून अतिशय निकृष्ट दर्जाची कामे होत असल्याचे समोर आले आहे. विरकुंड येथे कुठे कामेच झाली नाही, तर कुठे दर्जाहीन कामे झाली असल्याच्या तीव्र प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या. ग्रामपंच्यायतेच्या विकासात्मक धोरणावरच नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. 

ग्रामपंचायतेच्या माध्यमातून सुरु असलेली मनरेगाची कामे केवळ नवेगाव येथेच केली जात आहे. पूर्वीच्या काळात एक म्हण प्रचलित होती, "रोजगार हमी, अर्धे तुम्ही नी अर्धे आम्ही". याच म्हणीप्रमाणे ग्रामीण भागात मनरेगाची कामे होतांना दिसत आहे. गुणवत्ताहीन कामे करून केवळ शासनाचा निधी उधळला जात आहे. सर्वच मलाईचे धनी झाल्याने कामाची गुणवत्ता पाहणार तरी कोण. हितभर कामाचं हातभर बिल काढलं जात आहे. बोगस मजुरांच्या नावानेही बिलं काढली जात आहे. जनतेच्या पैशातून आपापलं हित साधलं जात आहे. जेथे खरंच रस्ते व नाल्यांची गरज आहे, तेथे कामे केली जात नाही. आणि काही ठिकाणी वरचेवर कामे केली जात आहे. आपसी संगमतातून सगळे डाव साधले जात असल्याची खुली चर्चा आता  गावाऱ्यांमधून ऐकायला मिळत आहे. गावातील विकासकामांबाबत ग्रामसचिवांकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता १४ ऑगस्टला ग्रामपंचायतेलाच कुलूप लागले होते. त्यांच्याशी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलण्याचे साधे सौजन्यही दाखविले नाही. त्यामुळे पाणी कुठे तरी मुरत असल्याचा संशय निर्माण होत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ग्रामीण भागातील विकासकामांचा आढावा घेणे गरजेचे झाले आहे.  

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी