अनोळखी मृतदेहाचे रहस्य उलगडले, एक महिला व दोन युवकांनी मिळून त्याचा खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न

प्रशांत चंदनखेडे वणी 

तहसील कार्यालयामागील महसुल भवनाजवळ काल २१ ऑगस्टला संशयास्पद स्थितीत आढळलेल्या मृतदेहाचा पोलिसांनी अवघ्या काही तासांतच उलगडा केला असून सदर इसमाची हत्या झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. त्या अनोळखी इसमाचा खून करणाऱ्या तीनही आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले असले तरी त्या अज्ञात इसमाचे नाव व त्याचा ठाव ठिकाणा शोधण्यात मात्र पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.  त्या अनोळखी इसमाचा खून केल्या प्रकरणी दोन युवकांसह एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. अनिकेत दादाराव कुमरे (२१) रा. सिंधी ता. मारेगाव, मारोती लक्ष्मण कुळमेथे (३४) गणेशपूर, रोशनी कांचन भगत (२५) रा. पंचशील नगर राजूर (कॉ.) असे या अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 

पोलिस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या महसूल भवनाजवळ एका ४५ वर्षीय अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती. काल २१ ऑगस्टला सकाळी १० ते ११ वाजताच्या सुमारास नव्याने बांधण्यात आलेल्या महसूल भवनाजवळ अज्ञान इसमाचा मृतदेह आढळून आला. मृतदेह हा संशयास्पद स्थितीत असल्याने  घातपाताचा संशय बळावला होता. त्यातच मृतकाच्या शरीरावर जखमा आढळल्याने पोलिसांनी तात्काळ मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठविला. शवविच्छेदन अहवालात सदर इसमाला जबर मारहाण करण्यात आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तपासचक्रे फिरवून अवघ्या काही तासांतच मारेकऱ्यांना जेरबंद केले. इसम हा अनोळखी असतांना व खुनाची कुठलीही लिंक मिळालेली नसतांना पोलिसांनी कौशल्यपूर्ण पद्धतीने तपास करून या प्रकरणाचा उलगडा केला. खून करणाऱ्या तिघांनाही पोलिसांनी अवघ्या काही तासांतच अटक केली. आरोपींनी सदर इसमाला डोक्यावर, छातीवर व पोटावर जड वस्तूने मारून खून केल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी अनिकेत कुमरे, मारोती कुळमेथे व रोशनी भगत यांच्यावर भादंवि च्या कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या खुनाबाबत शहरात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. त्या अनोळखी इसमाचे नाव व पत्ता शोधण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. पुढील तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात एपीआय माधव शिंदे करीत आहे. 

सदर कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अप्पर पोलिस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार अजित जाधव, सपोनि राजेश पुरी, माया चाटसे, माधव शिंदे, सपोउपनि सुदर्शन वानोळे, दिगांबर किनाके, सुहास मंदावार, पंकज उंबरकर, वसीम शेख, विशाल गेडाम, गजानन कुळमेथे यांनी केली.  

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी