भरधाव ट्रकच्या धडकेत एक जन जागीच ठार तर एक गंभीर जखमी, वणी निळापूर मार्गावरील घटना
प्रशांत चंदनखेडे वणी
रात्री शौचास गेलेल्या निळापूर या गावातील दोन व्यक्तींना भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. यात एक जन ट्रकखाली चिरडल्या गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर सोबतचा गंभीर जखमी झाल्याची घटना काल १६ ऑगस्टला रात्री १० वाजताच्या सुमारास वणी निळापूर मार्गावर घडली. निळापूर येथील कोल वॉशरीत कोळसा भरण्याकरिता सुसाट जात असलेल्या ट्रक चालकाने गावालगत शौचास बसलेल्या व्यक्तींवरच ट्रक चढविला. या अपघातात विनोद वारलू काळे (५५) हा जागीच ठार झाला. तर सुहास आत्राम (४०) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारार्थ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. निष्काळजीपणे व भरधाव वाहन चालवून निष्पाप जीवाचा बाळी घेणाऱ्या ट्रक चालकाला गावातील लोकांनी चांगलाच चोप दिल्याचे बोलल्या जात आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत चालकाला जमावाच्या तावडीतून सोडविल्याने पुढील अनर्थ टळला. पोलिसांनी अपघातास कारणीभूत ठरलेला ट्रक ताब्यात घेतला असून चालकालाही अटक केली आहे.
निळापूर येथील विनोद काळे व सुहास आत्राम हे दोघेही गावालगत रस्त्याच्या कडेला शौचास बसले होते. दरम्यान निळापूर जवळील कोल वॉशरीमध्ये कोळसा भरण्याकरिता जात असलेल्या भरधाव ट्रकने (MH ४० CD ६६३५) त्या दोघांनाही जोरदार धडक दिली. यात विनोद काळे हा ट्रकखाली चिरडल्या गेल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर सुहास आत्राम हा गंभीर जखमी झाला आहे. कोळसा सायडिंगवर अंतर्गत वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या जास्तीत जास्त चक्कर लागाव्या म्हणून ट्रक चालक सुसाट वाहने चालवितात. सायडिंगवर कोळसा खाली करून कोल वॉशरीत कोळसा भरण्याकरिता जात असलेल्या ट्रक चालकाने शौचास बसलेल्या व्यक्तींवरच ट्रक चढविला. ट्रक चालकाच्या निष्काळजीपणे वाहन चालविण्याने एका निष्पाप व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला. कोल वॉशरी मधून कोळसा सायडिंगवर इंटरनल शिफ्टिंग करणारी वाहने सुसाट धावतात. कोळसा वाहतुकीच्या या अति वेगवान वाहनांमुळे अनेक निष्पाप जीवांचे बळी गेले आहेत. सदर ट्रक हा कामठी येथिल ट्रान्स्पोटरचा असल्याचे कळते. हा ट्रक येथीलच एका ट्रान्स्पोट कंपनीच्या अटॅचमध्ये चालत आहे. पोलिसांनी ट्रकसह चालकालाही ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलिस करीत आहे.
Comments
Post a Comment