वणी येथील मॅकरून इंग्रजी माध्यमिक शाळा व पांढरकवडा तालुक्यातील सायखेडा जी.प. शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा

प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी वडगाव मार्गावरील मॅकरून इंग्रजी माध्यमिक शाळा व पांढरकवडा तालुक्यातील सायखेडा येथील जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य दीना निमित्त शाळेत ध्वजारोहण व विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शाळेच्या माध्यमातून विविध उपक्रमही राबविण्यात आले. 

मॅकरून या इंग्रजी माध्यमिक शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. शाळेचे उपाध्यक्ष पियुष आंबटकर, मुख्याध्यापिका शोभना यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना दिली. स्वातंत्र्य दीना निमित्त शाळेत देशभक्ती गीत, देशभक्ती नृत्य आदी विविध सांस्कृतिक कार्यक्रमही घेण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पियुष आंबटकर होते. तर मुख्याध्यापिका शोभना या प्रामुख्याने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्र संचालन तनिषा लाल व सनया कठाने या विद्यार्थिनींनी केले. यावेळी ६,७,८,९ व १० वी च्या विद्यार्थ्यांनी कवायती सादर केल्या. पाचवीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य सादर केले. सहावीच्या विद्यार्थिनींनी राष्ट्रगीत गायन केले. ७,८ व ९ वी च्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत गायन केले. तसेच नितीन कुरेकर व सरिता बुरडकर या शिक्षकांसह एंजल नगराळे, तनिषा कळसकर, जिवीका चौधरी, अश्मीरा खान, हितीशा पाचभाई, संस्कार खुशवा, जानव्ही पुंड, अकसा शेख, कृतिका आंबेकर, पर्वणी खडसे, नृशील चारनिया, अर्पित तलसे या विद्यार्थ्यांची स्वातंत्र्य दिनावर आधारित भाषणे झाली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विजेता शेरकी या विद्यार्थिनीने केले. 

पांढरकवडा तालुक्यातील सायखेडा ग्रामपंचायत व जी.प. शाळेत स्वातंत्र्य दिवस विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत येथे सरपंच ललिताबाई इरदंडे यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. तर जिल्हा परिषद शाळेत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश मोहुर्ले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक मधुकर कोडापे यांच्या मार्गदर्शनात हर घर तिरंगा अभियानांतर्गत गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. यात सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग दर्शविला होता. स्वातंत्र्य दिना निमित्त गावात विविध कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. स्वातंत्र्य दिनानिमित्त कोंघारा येथील कृषी महाविद्यालयातील आरएडब्लूई (RAWE) चे विद्यार्थी कुणाल मेघरे, अक्षय ओंकार, संकेत लेंडे, मोहित मुल्लेवार, अखिल क्षिरसागर यांनी गावकऱ्यांना कृषी विषयक मार्गदर्शन व जी.प. शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले.  

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी