वर्धा नदीवर आंघोळ करण्याकरिता गेलेले दोन जन गेले वाहून, तर दुसऱ्या घटनेत अनोळखी इसमाचा आढळला मुतदेह
प्रशांत चंदनखेडे वणी
दुथळी भरून वाहत असलेल्या वर्धा नदीवर आंघोळ करण्याकरिता गेलेले दोघे जन नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची खळबळ जनक व तेवढीच दुर्दैवी घटना आज १५ ऑगस्टला दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास घडली. नदीत वाहून गेलेले व्यक्ती हे वणी तालुक्यातील नायगाव (खु) व चंद्रपूर येथील रहिवासी असल्याचे समजते. सोबत असलेले सहा जन हे वर्धा नदीवर आंघोळ करण्याकरिता गेले होते. त्यातील दोघांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेले. त्या दोघांचा अद्याप शोध लागला नसून नदीपात्रात त्यांचा शोध घेतला जात आहे. तर दुसऱ्या घटनेत वणी मुकुटबन रोडवरील मानकी जवळ असलेल्या २ नंबर पुलाच्या खाली एका अज्ञात इसमाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या इसमाचे वय अंदाजे ३५ ते ४० वर्षे असून आज दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास तेथून जाणे येणे करणाऱ्या लोकांना या अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाची दुर्गंधी सुटल्याने ही घटना उघडकीस आली. हा इसम कोण व कुठला हे मात्र अद्याप कळू शकले नाही.
दुथळी भरून वाहत असलेल्या वर्धा नदी पात्रात काही हौशी आंघोळ करण्याकरिता गेले होते. नदी पात्रात आंघोळीचा मोह न आवरल्याने दोघे जन खोल पाण्यात गेले. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेले. सोबत असलेल्या चौघांनी ही माहिती आधी गावात व नंतर पोलिस स्टेशनला दिली. प्रवीण सोमलकर (३५) रा. चंद्रपूर व दिलीप पोसुरकर (५५) रा. नायगाव (खु) असे या नदीत वाहून गेलेल्या व्यक्तींची नावे आहेत. त्यांच्या सोबत असलेले विशाल तुरकर (३२), विजय उईके (३८), स्वप्नील सुरतेकर (२०), जगदीश बावणे (३५) हे मात्र सुखरूप बाहेर पडले. आज स्वातंत्र्य दिन असल्याने संपूर्ण बियरबार व दारूची दुकाने बंद होती. परंतु वर्धा नदीच्या जवळपास मुबलक दारू मिळत होती. अनेक शौकिनांनी ड्राय डे असतांनाही सहज दारू मिळत असल्याने मनसोक्त दारू ढोसली. दारू दुकाने बंद असतांना देखील काही बियरबार मधून बिनधास्त दारू मिळत असल्याचे वास्तव समोर आले आहे. प्रशासनाला न जुमानता काही दारू विक्रेते बंदीतही निडर होऊन दारू विकतात. त्यामुळे तळीरामांना ड्राय डे जाणवत देखील नाही. देशाच्या स्वातंत्र्याचा आनंद साजरा करतांना काही जन मनसोक्त झिंगले. तर काहींना नदी पात्रात आंघोळ करण्याचा मोह आवरला नाही. सहा जन थेट वर्धा नदीवर आंघोळ करण्याकरिता गेले. त्यातील दोघांना नदीच्या पाण्याचा अंदाज आला नाही, व ते पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेले. त्यांचा अद्याप शोध लागला नाही. त्या दोघांचाही नदी पात्रात युद्ध पातळीवर शोध घेतला जात आहे.
दुसऱ्या घटनेत वणी ते मानकी दरम्यान असलेल्या २ नंबर पुलाच्या खाली एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला. कुजलेल्या अवस्थेत असलेल्या या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. मृतदेहाची दुर्गंधी सुटल्याने तेथून जाणे येणे करणाऱ्या काही लोकांनी त्या दिशेने जाऊन बघितले असता त्यांना सदर इसमाचा मृतदेह आढळून आला. तीन ते चार दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे. सदर मृतदेहाची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. या इसमाचा मृत्यू नेमका कशाने झाला याचा उलगडा करण्याचे देखील आव्हान पोलिसांसमोर आहे. सदर इसमाने आत्महत्या केली की, त्याचा घातपात झाला हे पोलिस तपासातून लवकरच निष्पन्न होईल.
Comments
Post a Comment