मटका अड्ड्यांवर पोलिसांचे धाडसत्र, चार आरोपींसह ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त

प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी पोलिस स्टेशन हद्दीत सुरु असलेले सर्वच अवैध धंदे बंद करण्याचे जिल्हा पोलिस अधीक्षकांचे आदेश असल्याने ठाणेदार अजित जाधव यांनी मटका जुगारावर कार्यवाहीचा बडगाच उगारला आहे. मटका अड्डे चालविणाऱ्यांवर धडक कार्यवाहीचे ठाणेदारांनी आदेश दिल्याने पोलिस पथकाने मटका अड्ड्यांवर धाडसत्रच अवलंबलं आहे. शहरात खुलेआम व छुप्या पद्धतीने मटका अड्डे चालविणाऱ्यांवर पोलिसांनी कार्यवाहीचा धडाकाच सुरु केला आहे. काल २३ ऑगस्ट व आज २४ ऑगस्टला शहर पोलिस व एलसीबी पथकाने तब्बल चार मटका अड्ड्यांवर कार्यवाही करून चार आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी मटका अड्ड्यांवर कार्यवाहीची मोहीमच हाती घेतल्याने अवैध व्यवसायिकांचे आता चांगलेच धाबे दणाणले आहेत. शहरातील मटका अड्ड्यांबरोबरच शहरापासून ७ किमी अंतरावर असलेल्या गावातीलही मटका अड्ड्यांवर पोलिसांनी अशीच धडक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

पोलिसांनी काल २३ ऑगस्टला दीपक चौपाटी परिसरातील मटका अड्ड्यावर कार्यवाही करून मटका पट्टी फाडणाऱ्या वसीम फरीद शेख याला अटक केली. मटक्याच्या आकड्यांवर पैशाचा जुगार खेळवतांना पोलिसांना तो रंगेहात सापडून आला. पोलिसांनी त्याच्या जवळून मटका साहित्य व १० हजार २०० रोख असा मुद्देमाल जप्त केला आहे. मटका जुगारावरील दुसरी कार्यवाही आज २४ ऑगस्टला एकता नगर जवळील प्रवासी निवाऱ्याजवळ करण्यात आली. प्रवासी निवाऱ्याजवळ सार्वजनिक ठिकाणी वरळी मटका खेळविणाऱ्या सट्टेबाजाला पोलिसांनी मटका पट्टी फाडतांना रंगेहात अटक केली. चिट्ठीवर मटक्याचे आकडे लिहून पैशाचा जुगार खेळविणाऱ्या सैय्यद मुश्ताक सैय्यद गफ्फार (४९) रा. एकता नगर याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या जवळून मटक्याचे आकडे लिहीण्याकरिता वापरले जाणारे साहित्य व रोख ७ हजार ३०० रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

सदर कार्यवाही एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात व ठाणेदार अजित जाधव यांच्या आदेशावरून पो.हे.कॉ. विकास धडसे, पो.कॉ. शुभम सोनुले, सागर सिडाम, वसीम शेख, शंकर चौधरी यांनी केली. 
 
स्थानिक गुन्हे शाखा पथकाच्याही दोन मटका अड्ड्यांवर धाडी 

अवैध धंद्यांवरील कार्यवाही करिता एलसीबी पथकही सज्ज असून २३ व २४ ऑगस्टला एलसीबी पथकानेही भाजी मार्केट व सिंधी कॉलनी परिसरात सुरु असलेल्या मटका अड्ड्यांवर धाडी टाकून दोन आरोपींना अटक केली आहे. अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे वरिष्ठांचे आदेश असल्याने अवैध धंद्यांची माहिती मिळविण्याकरिता शहरात गस्त घालणाऱ्या एलसीबी पथकाने छुप्या पद्धतीने सुरु असलेल्या दोन मटका अड्ड्यांवर कार्यवाही करून दोन आरोपींसह १५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.  २३ ऑगस्टला दुपारी ३ वाजताच्या सुमारास भाजी मार्केट येथे सुरु असलेल्या मटका अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखा पथकाने कार्यवाही केली.  तेथे मटका पट्टी फाडणाऱ्या शेख मजहर शेख हसन (२६) याला एलसीबी पथकाने रंगेहात अटक केली. त्याच्या जवळून पोलिसांनी ४ हजार २७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दुसरी कार्यवाही आज २४ ऑगस्टला सकाळी १० वाजताच्या सुमारास सिंदी कॉलनी परिसरातील मनोहर बार जवळ करण्यात आली. याठिकाणी राजरोसपणे सुरु असलेल्या मटका अड्ड्यावर एलसीबी पथकाने धाड टाकून मटक्याच्या आकड्यांवर पैशाचा जुगार खेळविणाऱ्या अमोल गणपत गेडाम (४२) याला अटक केली. त्याच्या जवळून पोलिसांनी मटका साहित्य व रोख ११ हजार ४३० रुपये  असा मुद्देमाल जप्त केला आहे.  अटक केलेल्या सर्वच आरोपींवर मजुका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मटका पट्टी फाडतांना अटक करण्यात आलेल्या आरोपींनी सांगितल्याप्रमाणे मटका अड्डा चालविणाऱ्या मालकांवरही एलसीबी पथकाने सहकलम १०९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 
सदर कार्यवाही वरिष्ठांच्या मार्गदर्शनात सपोनि अतुल मोहनकर, पो.हे.कॉ. योगेश डगवार, पो.अ. सुधीर पांडे, भोजराज करपते, निलेश निमकर, रजनीकांत मडावी, सतीश फुके यांनी केली.  


Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी