धावत्या बसचे समोरील चाक निघाले, चालक व वाहकाच्या समयसूचकतेमुळे टळला मोठा अनर्थ

प्रशांत चंदनखेडे वणी 

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची वणी आगाराची वणी झरी ही बस दुर्घटनाग्रस्त होण्यापासून थोडक्यात बचावली. धावत्या बसचे समोरील चाक अचानक निघाले. चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला. या बसमध्ये १३ शाळकरी विद्यार्थी प्रवास करीत होते. धावत्या बसचे आयबीम पासून चाक वेगळे होऊन दूरवर फेकल्या गेले. समोरील चाक निघाल्याने बस अनियंत्रित होऊन मोठा अपघात घडला असता. पण चालकाने प्रसंगावधान राखत बसवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना आज सकाळी ६.४५ ते ७ वाजताच्या सुमारास झरी जवळ घडली. बस डेपोमध्ये बसच्या देखभाल व दुरुस्तीकडे लक्ष दिले जात नसल्याने अशा प्रकारच्या घटना घडू लागल्या आहेत. एसटी महामंडळाच्या बसेस जागोजागी नादुरुस्त अवस्थेत उभ्या असलेल्या नेहमी पहायला मिळतात. फिटनेस चेक न करता बसेस प्रवासाकरिता पाठविल्या जात असल्याची गंभीर बाब परत एकदा या घटनेमुळे समोर आली आहे. 

वणी आगाराची वणी झरी ही बस (MH ४० AQ ६०९२) सकाळी ६ वाजता झरीच्या प्रवासाला निघाली. मार्गातील गावांमध्ये थांबा घेत ही बस झरीकडे जात असतांना झरी जवळ या बसचे समोरील चाक आयबीम पासून वेगळे झाले. धावत्या बसचे चाक अचानक निघाल्याने एकच खळबळ उडाली. बसमध्ये १३ विद्यर्थी प्रवास करीत होते. बसचे चाक निघताच प्रवाशांमध्ये घबरहाट पसरली. बस चालकाने प्रसंगावधान राखत बसवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला. बस मधिल सर्व प्रवासी सुखरूप असून त्यांना कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही. प्रवाशांचे दैव बलवत्तर म्हणून अघटित घटना टळली. बस चालक अवी किनाके व वाहक शितल दुरूतकर त्यांच्या सर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. सुलभ व सुखरूप प्रवासाची हमी देणारे एसटी महामंडळ बसच्या दुरुस्ती व देखभालीकडे दुर्लक्ष करून प्रवाशांचा जीव धोक्यात घालू लागले आहे. डेपो मधून बस प्रवासाकरिता निघण्याआधी बसमधील तांत्रिक बाबींची योग्यरीत्या तपासणी केली जात नसल्याने बसेस जागोजागी नादुरुस्त होऊन उभ्या राहतांना दिसत आहे. 

धावत्या बसचे चाक निघून ते दूरवर फेकल्या गेले. बसचे समोरील चाक निखळल्यास बस उलटण्याची किंवा कुठेही धडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. बसचे चाक निघाताच १३ विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला होता. परंतु बस चालक व वाहकाच्या समयसूचकतेमुळे मोठा अनर्थ टळला. बस अपघातग्रस्त होण्यापासून थोडक्यात बचावली. एसटी महामंडळाचे बसच्या दुरुस्ती व देखभालीकडे सपशेल दुर्लक्ष होऊ लागले आहे. चाकांचे हब ग्रीसिंग व किनपीनची कामे योग्य वेळी केली जात नसल्याने हब बेरिंग तुटतात, व चाक हब ड्रमसह आयबीम पासून वेगळे होऊन दूर फेकल्या जाते. त्यामुळे बसचा अपघात तर होऊच शकतो. पण त्या बस पासून वेगळ्या होणाऱ्या चाकामुळे इतरही वाहनाचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रवाशांचे दैव बलवत्तर म्हणून अघटित घटना टळली. बसच्या देखभाल व दुरुस्तीकडे एसटी महामंडळ जातीने लक्ष घालत नसल्याने बसेसचे फिटनेस खालावू लागले आहेत. एसटी महामंडळ नादुरुस्त बसेस प्रवासाकरिता पाठवून प्रवाशांच्या जीविताशी खेळत असल्याच्या प्रतिक्रिया आता नागरिकांमधूनच नाही तर एसी महामंडळाच्या चालक व वाहकांमधूनही उमटू लागल्या आहेत.  

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी