बॉर्डेक्स पेस्टच्या वापराबद्दल कृषी कन्यांनी शेतकऱ्यांना केले महत्वपूर्ण मागदर्शन
प्रशांत चंदनखेडे वणी
पांढरकवडा तालुक्यातील कोंघारा येथिल कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी दातपाडी या गावातील शेतकऱ्यांना शेत पिकांवरील व फळझाडांवरील रोगांवर बॉर्डेक्स पेस्ट या रोग विनाशक औषधाचा वापर कसा करावा, याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. शेत पिकांवरील कोणत्या रोगांवर बॉर्डेक्स पेस्ट हे उपयुक्त ठरतं, याबद्दलही कृषी कन्यांनी शेतकऱ्यांना माहिती दिली.
कोंघारा कृषी महाविद्यालयात सातव्या सत्रात शिक्षण घेणाऱ्या कृषी कन्यांनी दातपाडी या गावातील शेतकऱ्यांना बॉर्डेक्स पेस्टच्या वापराबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. शेत पिकांवरील कोणत्या रोगांपासून बॉर्डेक्स पेस्ट संरक्षण करतं, याबद्दलही कृषी कन्यांनी शेतकऱ्यांना माहिती दिली. बॉर्डेक्स पेस्ट हे फळझाडांसाठी खास करून उपयुक्त ठरतं. फळझाडांवरील रोगांसाठी बॉर्डेक्स पेस्टचा वापर फायद्याचा ठरतो. खोडसड, डिंक्या रोग तसेच पावडर बुरशी व खालची बुरशी या सारख्या रोगांवरही बॉर्डेक्स पेस्ट गुणकारी ठरतं. बॉर्डेक्स पेस्ट हे नेमकं काय आहे, त्याचा फायदा काय, त्याचा वापर कसा करावा, त्यासाठी लागणारे साहित्य कोणते, याचीही कृषी कन्यांनी शेतकऱ्यांना माहिती दिली. शेत पिकांवरील व फळझाडांवरील कोणत्या रोगांवर बॉर्डेक्स पेस्ट हे प्रभावी ठरू शकत, याबद्दल प्रा. काजल माने यांनीही मार्गदर्शन केलं. शेत पिकांचे व फळझाडांचे रोगांपासून संरक्षण करण्याकरिता बॉर्डेक्स पेस्टचा वापर कारण्याबद्दलची महत्वपूर्ण माहिती कृषी महाविद्यालयाच्या शर्वरी दसोडे, वैष्णवी काळे, रासेश्वरी जुमडे, सृष्टी गायमुखे, वैष्णवी कोटकर या कृषी कन्यांनी शेतकऱ्यांना दिली.
Comments
Post a Comment