खाकी वर्दीतील माणुसकीचं घडलं दर्शन, दोन महिन्यांपासून बेपत्ता इसमाची घडवून आणली कुटुंबाशी भेट
प्रशांत चंदनखेडे वणी
तेलंगणा राज्यातून बेपत्ता झालेल्या इसमाची कुटुंबियांशी भेट घडवून आणत शिरपूर पोलिस स्टेशनचे नवनियुक्त ठाणेदार संजय राठोड यांनी खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन घडविले आहे. तेलंगणा राज्यतून बेपत्ता झालेला इसम थेट महाराष्ट्रात येऊन पोहचला. शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीतील कायर गावात तो खुळ्यागत भटकत होता. अंगावर मळकटलेले कपडे, बोली भाषा तेलंगू व परिसरात अनोळखी असलेला हा इसम गणेशोत्सवानिमित्त पोलिस हद्दीत गस्त घालणाऱ्या ठाणेदारांच्या दृष्टीस पडला. त्याची अवस्था पासून खाकी वर्दीतील माणुसकी जागी झाली. ठाणेदारांनी त्याच्या जवळ जाऊन आस्थेने त्याची विचारपूस केली, पण तो नुसताच तेलंगू भाषेत पुटपुटत होता. ठाणेदारांनी त्याला पोलिस स्टेशनला आणले. त्याच्या बोली भाषेवरून तो तेलंगणा राज्यातील असल्याचा ठाणेदारांना अंदाज आला. त्यांनी लगेच तेलंगणा राज्यातील मंचराल पोलिस स्टेशनशी संपर्क साधला. तेलंगू भाषिक इसम अनावधानाने महाराष्ट्रात भटकला असल्याची माहिती देत त्यांनी मंचराल पोलिसांना सदर इसमाचे छायाचित्र पाठविले. मंचराल पोलिसांनी काही तासांतच त्या इसमाची ओळख पटविली. तो येथीलच रहिवासी असल्याचे सांगत दोन महिन्यांपासून तो बेपत्ता असल्याचा मंचराल पोलिसांनी दुजोरा दिला. ठाणेदार संजय राठोड यांच्या कर्तव्यदक्षपणामुळे एक बेपत्ता इसम आपल्या कुटूंबात परतला. तेलंगणातून महाराष्ट्रात भडकलेल्या इसमाला कुटुंब भेट घडवून आणत ठाणेदार संजय राठोड यांनी खाकी वर्दीतील माणुसकीचं दर्शन घडविलं आहे.
तेलंगणा राज्यातील धर्मपूरम ता. धर्मसागर जि. हनुमकोंडा येथील रहिवाशी असलेला मेहकला रमेश परमया (४५) हा मागील दोन महिन्यांपासून घरून बेपत्ता होता. तो तेलंगणातून थेट ४०० किमी दूर महाराष्ट्रात येऊन पोहचला. तेथे कुटुंब त्याची शोधाशोध घेत होतं. दरम्यान गणेशोत्सवाची धामधूम सुरु असल्याने शिरपूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार संजय राठोड पोलिस पथकासह पोलिस स्टेशन हद्दीत गस्तीवर होते. त्यांना कायर या गावात एक इसम खुळ्यागत फिरतांना दिसला. अंगावर मळकटलेले कपडे व बोली भाषा तेलंगू. हा इसम परिसरात सर्वांनाच अपिरिचित होता. ठाणेदार संजय राठोड यांनी सदर इसमाची आस्थेने विचारपूस केली. पण त्याला भाषा कळत नसल्याने तो केवळ तेलंगू भाषेत पुटपुटत होता. ठाणेदारांना तो तेलंगणा राज्यातून महाराष्ट्रात भटकल्याचा अंदाज आला. त्यांनी त्या इसमाला पोलिस स्टेशनला आणले. तेलंगणा राज्यातील मंचराल पोलिस स्टेशनशी संपर्क साधला. सदर इसमाबाबत तेथिल पोलिसांना माहिती दिली. त्याचे छायाचित्र मंचराल पोलिसांना पाठविले. ठाणेदार संजय राठोड यांची कार्यतत्परता व कर्व्यनिष्ठतेमुळे सदर इसमाची ओळख पटली. गावच्या सरपंचाने फोन करून तो व्यक्ती आमच्याच गावातील असल्याचे गहिवरून सांगितले. दोन महिन्यांपासून हरविलेला व्यक्ती सुखरूप मिळाल्याने कुटुंबियांच्याही डोळ्यात आनंदाश्रू तरंगले. ठाणेदार संजय राठोड यांनी संवेदनशीलता दाखविल्याने तेलंगणातून महाराष्ट्रात भडकलेला व्यक्ती आपल्या कुटुंबापर्यंत पोहचू शकला. दोन महिन्यांपासून घरून बेपत्ता असलेल्या इसमाची कुटुंबियांशी भेट घडवून आणल्याने कुटुंबीयांनी पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. असे असले तरी ठाणेदारांनी खाकी वर्दीतील माणुसकीचं दर्शन घडविल्याने त्यांच्या कार्यप्रणालीची प्रशंसा केली जात आहे.
Comments
Post a Comment