सेवा पंधरवाडा अंतर्गत वणी विधानसभा क्षेत्रात भव्य रक्तदान व आरोग्य तपासणी शिबीर
प्रशांत चंदनखेडे वणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या काळात सेवा पंधरवाडा हा सेवाभावी उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने पंडित दीनदयाल उपाध्याय व वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून २५ सप्टेंबरला भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक बाजोरिया हॉल येथे सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत हे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले असून रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरात मोठया संख्येने रक्तदान करण्याचे आव्हान आयोजकांनी केले आहे.
आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या रक्तदान शिबिरादरम्यान पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. सेवा पंधरवाडा अंतर्गत २५ सप्टेंबरलाच कायर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले आहे. यात डायबिटीज, रक्तदाब, हिमोग्लोबिन, सिकलसेल, टी.बी., कुष्ठरोग, लिव्हर, किडनी, कॅन्सर, डेंग्यू, मलेरिया यासह गरोदर मातांची देखील तपासणी करण्यात येणार आहे. २९ सप्टेंबरला घोन्सा येथील गजानन महाराज देवस्थान येथे व शिरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंत मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात येणार आहे. या आरोग्य शिबिराचा तालुक्यातील जनतेने मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आव्हान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केले आहे.
Comments
Post a Comment