सामाजिक कार्याची तळमळ आणि जिद्द उरी बाळगणाऱ्या प्रदीप बांदूरकर याचा आज वाढदिवस, त्या निमित्त हा लेख
प्रशांत चंदनखेडे वणी
शैक्षणिक धडे गिरवतांनाच त्याला समाजकार्याची ओढ लागली. राजूर हे चळवळीचं गाव म्हणून ओळखलं जातं. सामाजिक चळवळीची भूमी असलेल्या राजूर या गावातून अनेकांना सामाजकार्याची प्रेरणा मिळाली. राजूर या गावातच लहानाचा मोठा झालेला प्रदीप हा देखील सामाजिक जाणिवेने प्रेरित झाला. समाजकार्य आपल्याही हातून घडावं ही महत्वाकांक्षा त्याच्यात जागली. समाजकार्य करण्याचं धेय्य उराशी बाळगून त्याने सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिलं. सामाजिक कामांना त्याने हात घातला. नागरिकांचे प्रश्न व समस्या सोडविण्यावर त्याने भर दिला. गावातील समस्यांना घेऊन त्याने वेळोवेळी आवाज उठविला. नागरिकांचे प्रश्न ताकदीने प्रशासनासमोर मांडले. गावातील समस्यांचे निराकरण करण्याची जिद्द त्याने बाळगली. गावकऱ्यांना सोइ सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता नेहमी त्याने पुढाकार घेतला. प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून त्याने मूलभूत व आवश्यक सोइ सुविधा गावकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या. सामाजिक कार्याची वाट काटेरी असली तरी त्याने समाजकार्याची नाळ तुटू दिली नाही. समाजकार्य करतांना त्याने कधी आपल्या नावाचा उदोउदो केला नाही. निस्वार्थ भावना जपली. आपल्या नावाची चर्चा व्हावी, ही त्याची धारणा मुळीच राहिली नाही. त्याचं कार्यच त्याची ओळख बनली. त्याची संयमी वाटचाल असली तरी समाजकार्यात त्याची नेहमीच आक्रमकता पाहायला मिळाली. नावासाठी कार्य नाही तर कार्यातून नाव पुढे आलं पाहिजे अशी मानसिकता जपणारं व्यक्तिमत्व म्हणजे प्रदीप बांदूरकर. संघर्ष हा जीवनाचा भाग असला तरी ध्येर्य अंगिकारल्यास संघर्षमय वाटचालीतूनही धेय्य गाठता येतं. आणि त्याचंच मुर्तिमंद उदाहरण म्हणजे प्रदीप बांदूरकर हे आहे.
समाजकारणाला राजकारणाची जोड मिळाली की, कार्याची गती वाढते. कार्य आणखीच सुलभरीत्या करता येतं. दुप्पट वेगाने कामे पूर्ण होतात. हा दृष्टिकोन ठेऊन प्रदीप बांदूरकर हा युवक राजकारणात आला. त्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश घेतला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून त्याने सामाजिक कार्याला गती दिली. त्याच्या कार्याची दखल घेत राजूर विभागाचा प्रमुख म्हणून त्याला बढती मिळाली. राजकीय व सामाजिक कार्याचा मेळ घालत त्याने अनेक लोकहिताची कामे केली. गावातील प्रश्न सोडविण्याकरिता पर्यायी त्याने प्रशासनाला अल्टिमेटमही दिले. गावातील समस्या व प्रश्न सोडविण्याला नेहमी त्याने प्राथमिकता दिली. गावातील समस्यांचे निराकरण करीत त्याने गावकऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावले. नंतर राजकारणात कोंडी होऊ लागल्याने त्याने मनसेतून निवृत्ती घेतली. पण सामाजिक वाटचाल मात्र सुरु ठेवली. कालांतराने त्याला भारतीय जनता पार्टीची ऑफर आली. आज तो भाजपचा सक्रिय कार्यकर्ता आहे. समाजकार्यातून राजकारण आणि राजकारणातून समाजसेवा हा त्याचा निरंतर प्रवास सुरु आहे. त्याची समाजकार्याची तळमळ अशीच निरंतर रहावी हीच सदिच्छा आज त्याच्या जन्मदिनी व्यक्त करून त्याच्या भावी वाटचालीला मनःपूर्वक शुभेच्छा देत आहे. आंतरिक कल्पकतेतून समाजकार्याचा ध्यास अंतर्मनात कोरलेल्या प्रदीप बांदूरकर याला वाढ दिवसाच्या मंगलमय शुभेच्छा !
जिद्द आहे उरी आणि ताठ आहे कणा, साद घालून एकदा लढ म्हणा. हा बाणा प्रदीप बांदूरकर याच्या उरात आजही धडधडतो आहे.
Comments
Post a Comment