अवैध दारू विक्रेत्यांवर पोलिसांची धडक कार्यवाही, १ लाख ७३ हाजारांच्या मुद्देमालासह चार आरोपींना केली अटक
प्रशांत चंदनखेडे वणी
पोळा व तान्हा पोळा हे पारंपरिक सन परिवारासह आनंदोत्सहात साजरे केले जातात. हे सण साजरे करतांना शांतता भंग होऊ नये म्हणून वणी पोलिस स्टेशन हद्दीतील सर्व दारू दुकाने व बियरबार दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला. त्यानुषंगाने १४ व १५ सप्टेंबरला सर्व प्रकारची दारूची दुकाने व बियरबार बंद ठेवण्यात आल्याने शहरात अवैधरित्या दारू विक्री होऊ नये, याचीही पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येत आहे. ठाणेदार अजित जाधव यांनी गुन्हे शोध पथकाला अवैध दारू विक्रेत्यांवर धडक कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे गुन्हे शोध पथक अलर्ट झालं असून पथकाने शहरात गस्त वाढविली आहे. शहरात अवैध दारू विक्री होऊ नये म्हणून गुन्हे शोध पथक शहरात गस्त घालीत असतांना त्यांना अवैध विक्री करीता मोटारसायकलने दारूची वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. पोलिसांनी अवैध विक्री करीता मोटरसायकलने दारू घेऊन जाणाऱ्या चार अवैध दारू विक्रेत्यांवर धडक कार्यवाही करून त्यांना अटक केली आहे. त्यांच्या जवळून पोलिसांनी १ लाख ७३ हजार ९४८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
महारष्ट्र दारू बंदी कायद्याच्या कलम १४२ (२) अन्वये वणी पोलिस प्रशासनाने पोळा व तान्हा पोळा या सणा निमित्त १४ व १५ सप्टेंबरला रात्री ११ वाजेपर्यंत वणी पोलिस स्टेशन हद्दीतील सर्व दारूची दुकाने व बियरबार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. पारंपरिक पद्धतीने साजरे होणारे हे दोनही सण शांततेत पार पडावे, या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला. या दरम्यान शहरात अवैध दारू विक्री होऊ नये याचीही पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येत आहे. गुन्हे शोध पथकाला अवैध दारू विक्रेत्यांवर धडक कार्यवाहीचे आदेश देण्यात आले आहे. त्यानुषंगाने गुन्हे शोध पथक आज १४ सप्टेंबरला शहरात गस्त घालत असतांना त्यांना अवैध विक्री करीता मोटारसायकलने दारूची वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी शहरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी कार्यवाही करून अवैध विक्री करीता मोटारसायकलने दारूची वाहतूक करणाऱ्या चार अवैध दारू विक्रेत्यांना अटक केली आहे.
अवैध दारू विक्रेत्यांवरील पहिल्या कार्यवाहीत पोलिसांनी विदेशी दारूच्या १८० मिलीच्या १३५ शिश्या, देशी दारूच्या ९० मिलीच्या १०० शिश्या किंमत एकूण २७ हजार ८० रुपये व मोटरसायकल (MH २९ BK ५९०५) किंमत ४५ हजार रुपये असा एकूण ७२ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून भूपेंद्र रमेशसिंह भदोरिया (४५) व आकाश शंकर कावडे (३२) दोघेही रा. कायर या अवैध दारू विक्रेत्यांना अटक केली आहे. दुसऱ्या कार्यवाही पोलिसांनी विदेशी दारूच्या १८० मिलीच्या ८२ शिश्या किंमत १३ हजार ३२० रुपये व मोटरसायकल (MH २९ BT २२०२) किंमत ४० हजार रुपये असा एकूण ५३ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून संजय हरिभाऊ पडोळे (५०) रा.तेली फैल या अवैध दारू विक्रेत्याला अटक केली आहे. तिसऱ्या कार्यवाहीत पोलिसांनी देशी दारूचे १८० मिली व ९० मिलीचे एकूण १९८ नग किंमत ८ हजार ५४८ रुपये व मोटरसायकल (MH २९ BM ५७४८) किंमत ४० हजार रुपये असा एकूण ४८ हजार ५४८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून व्यंकटेश मल्लेश जंगम (३०) रा. लालपेठ जि. चंद्रपूर या अवैध दारू विक्रेत्याला अटक केली आहे. अवैध दारू विक्रेत्यांवरील या तीनही धडक कार्यवाहीत गुन्हे शोध पथकाने एकूण १ लाख ७३ हजार ९४८ रुपयांचा मुद्देमाल व चार आरोपींना अटक केली आहे. या चारही आरोपींवर महाराष्ट्र दारू बंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कार्यवाही एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात व ठाणेदार अजित जाधव यांच्या आदेशावरून सपोनि दत्ता पेंडकर, लेखनिक भानुदास हेपट, गुन्हे शोध पथकाचे पोलिस जमादार विकास धडसे, पोकॉ. शुभम सोनुले, सागर सिडाम, सुनिल नलगंटीवार यांनी केली.
Comments
Post a Comment