विदर्भावर अन्याय करणाऱ्या नागपूर कराराची विदर्भवाद्यांनी केली होळी, वेगळ्या विदर्भासाठीचा लढा आणखीच तीव्र
प्रशांत चंदनखेडे वणी
विदर्भाला स्वतत्र राज्याचा दर्जा मिळावा म्हणून विदर्भ राज्य आंदोलन समितीने उभारलेला लढा आणखीच तीव्र झाला आहे. विदर्भ राज्य आंदोलन समितीचा विदर्भ राज्याच्या निर्मिती करिता एकाकी संघर्ष सुरु असून वेगळ्या विदर्भाची मागणी त्यांनी शासनाकडे रेटून धरली आहे. महाराष्ट्राशी संलग्न राहून विदर्भाचा विकास शक्य नसल्याचे विदर्भवाद्यांनी वेळोवेळी पटवून दिले आहे. महाराष्ट्रात विदर्भावर नेहमीच अन्याय होत आला आहे. विदर्भावर अन्याय करणाऱ्या नागपूर कराराचीच विदर्भवाद्यांनी होळी करून वेगळ्या विदर्भ राज्याच्या निर्मितीची आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
२८ सप्टेंबर १९५३ ला नागपूर करार करून पश्चिम महाराष्ट्रातील मातब्बर नेत्यांनी १ मे १९६० ला विदर्भासह महाराष्ट्र राज्याची निर्मिती केली. एकूणच ११ कलमी असलेल्या या करारात काही महत्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या. त्यामुळे विदर्भाचा विकास होईल अशी अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही. विदर्भाच्या सर्वांगीण विकासाला पाने पुसल्या गेली. महाराष्ट्र राज्यात निर्माण होणाऱ्या सरकारी नोकऱ्या व इतर सुविधांमध्ये विदर्भातील जनतेला लोकसंख्येच्या आधारावर २३ टक्के वाटा मिळेल असे अपेक्षित होते. पण झाले उलट. विदर्भावर सर्वच बाबतीत मोठा अन्याय करण्यात आला. विदर्भात सर्वच क्षेत्रात मोठा अनुशेष निर्माण झाला आहे. त्यामुळे विदर्भावर अन्याय करणाऱ्या या विदर्भ कराराचीच विदर्भवाद्यांनी होळी करून आपला संताप व्यक्त केला आहे. आता महाराष्ट्राशी संलग्नच रहायचे नाही, अशी तीव्र भूमीका घेत त्यांनी स्वतंत्र विदर्भ राज्य झालेच पाहिजे असा निर्धार केला आहे.
राज्याच्या निर्मिती करीता आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा विदर्भात आहे. वीजनिर्मिती, जंगल, खनिज, सुपीक जमीन या सर्व गोष्टी मुबलक असतांना विदर्भ राज्याची निर्मिती केली जात नाही यापेक्षा मोठं दुर्दैवं आणखी काय असू शकतं. विदर्भात सर्व साधन सामुग्री असतांना विदर्भातील तरुणांच्या हाताला काम नाही. त्यामुळे नक्षलवाद, बेरोजगारी, कुपोषण, शेतकरी आत्महत्या व इतरही समस्या निर्माण झाल्या आहेत. आणि म्हणूनच विदर्भावर अन्याय करणाऱ्या या नागपूर कराराची विदर्भवाद्यांनी होळी केली. विदर्भ राज्य आंदोलन समिती वणी, मोरगाव व झरीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे नागपूर कराराच्या प्रती जाळण्यात आल्या. यावेळी प्रा.पुरुषोत्तम पाटील, रफिक रंगरेज, राहुल खारकर, प्रा.बाळासाहेब राजुरकर, मुख्या.नामदेवराव जेनेकर, संजय चिंचोलकर, संजय खाडे, राजू पिंपलकर, प्रविण खानझोडे, एड.रुपेश ठाकरे, अमित उपाध्ये, प्रमोद खुरसने, धीरज भोयर, अलकाताई मोवाडे, निलिमाताई काळे, अनिल गोवारदिपे, राकेश वराटे, देवराव पा.धांडे, दशरथ पाटील, होमदेव कनाके, देवा बोबडे, रामदास पा.पखाले, प्रभाकर उईके, मारोती मोवाडे, भाऊराव लखमापूरे, विठ्ठल हेकाडे, व्हि.बि.टोंगे यांच्यासह विदर्भवादी कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment