मराठी पाट्या लागतील आता महाराष्ट्रातील सर्व दुकानांवर, सर्वोच्च न्यायालयाने दिला निर्णय, मनसे कडून शहरात जल्लोष

प्रशांत चंदनखेडे वणी 

महाराष्ट्रातील सर्व दुकानांवर दोन महिन्यात मराठी पाट्या लावण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने व्यापाऱ्यांना दिले आहे. महाराष्ट्रातील सर्वच लहान मोठ्या दुकानांवर मराठी पाट्या असणे गरजेचे असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले आहे. महाविकास आघाडीचे सरकार असतांना दुकानांवर मराठी पाट्या सक्तीच्या करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या विरोधात व्यापाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सोमवारी या याचिकेवर सुनावणी घेतांना न्यायालयाने व्यापाऱ्यांना फटकार लावत दोन महिन्यात दुकानांवर मराठी पाट्या लावा, असा आदेश दिला आहे. न्यायालयाने माविआ सरकारचा निर्णय कायम ठेवला असून काही अटींनुसार प्रत्येक छोट्या मोठ्या दुकानांवर मराठी पाट्या असणे गरजेचे असल्याचे मत नोंदविले आहे. दसरा, दिवाळी सारखे  सण जवळ आले आहे. त्यामुळे मराठी पाट्यांचा दुकानदारांनाच मोठा फायदा होणार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाच्या या आदेशाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जोरदार स्वागत करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतांना मनसे कडून शहरातील शिवतीर्थ चौक येथे फटाक्यांची तुफान आतिषबाजी करण्यात आली. 

बार ऍन्ड बेन्चनुसार व्यापारी संघाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. व्यापारी संघाच्या वकिलांनी मराठी पाट्यांची सक्ती म्हणजे मूलभूत अधिकारांचे उल्लंघन असल्याच्या युक्तिवाद केला. मराठी पाट्यांची सक्ती करण्यात आल्याने नामफलक बदलण्यात मोठा खर्च होणार असल्याचे याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी म्हटले. यावर सुप्रीम कोर्टाने तुम्ही मराठी पाट्या का लावू शकत नाही, असा प्रश्न विचारात नियम पाळा असे आदेशित केले. कर्नाटकातही हाच नियम आहे. मराठी फॉन्ट इतका छोटा व इंग्रजी फॉन्ट मोठा ठेवाल, यात मूलभूत अधिकारांचे उल्लंघन कुठे आहे ? दिवाळी दसऱ्याच्या आधी मराठी पाट्या लावण्याची वेळ आली आहे. तुम्ही महाराष्ट्रात आहात तुम्हाला मराठी पाट्यांचा फायदा माहिती नाही काय? आम्ही परत तुम्हाला मुंबई हायकोर्टात पाठविले तर तुम्हाला मोठा भुर्दंड बसू शकतो या शब्दात सर्वोच्च न्यायालयाने व्यापाऱ्यांना फटकारले.  

सुप्रीम कोर्टाने व्यापाऱ्यांना मराठी पाट्या लावण्याचा आदेश दिल्याबद्दल मनसे कडून वणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष करण्यात आला. मनसेचे नेते राजू उंबरकर यांनी न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत करून आभार व्यक्त केले. सर्व व्यापाऱ्यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करून सहकार्य करण्याची अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. महाराष्ट्रातील सर्व दुकानांवर मराठी पाट्या लावण्यात याव्या ही मनसेची १७ वर्षांपासूनची मागणी होती. मनसेने दुकानांवर मराठी पाट्या लावण्याबाबत आक्रमक भूमिकाही घेतली होती. मराठी पाटी आंदोलनामुळे मनसे सैनिकांना तुरुंगात देखील जावे लागले होते. अखेर मनसेच्या या लढ्याला यश आले. माविआ सरकारने घेतलेल्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. दोन महिन्यात व्यापाऱ्यांना दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. न्यायालयाच्या या आदेशाने मराठी भाषेचा आदर राखला गेला सल्ल्याची प्रतिक्रिया मराठी माणसांमधून उमटू लागली आहे.

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी