राजूर ग्रामपंचायतीत सरपंच व सचिवांचा मनमानी कारभार, सदस्य व गावकऱ्यांनी केली बीडीओंकडे तक्रार
प्रशांत चंदनखेडे वणी
वणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या राजूर ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभारामुळे गावातील नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. सरपंच व सचिव मनमर्जी कामे करीत असल्याने गावकऱ्यांमध्ये रोष दिसून येत आहे. सरपंच व सचिवच ग्रांमपंचायतेचा कारभार हाकत असून सदस्य व गावकऱ्यांना विश्वासात न घेताच महत्वाचे निर्णय घेतले जात असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. सरपंच व सचिवांनी ग्रामसभा न घेताच घरकुलासाठी लाभार्थ्यांची यादी तयार केली असून गरीब व दुर्बल घटकांना घरकुलाच्या लाभापासून डावलण्याचा प्रयत्न केला जात आहे. ग्रामपंचायतेत सरपंच व सचिवांचा मनमानी कारभार सुरु असून त्यांच्या मनमर्जी धोरणामुळे ग्रामवासी पुरते वैतागले आहेत. गावातील समस्यांकडेही सरपंच व सचिवांचे दुर्लक्ष होतांना दिसत आहे. गावात डेंग्यू व मलेरिया सारख्या गंभीर आजारांची साथ आलेली असतांना ग्रामपंचायतेकडून मात्र कोणत्याही उपाययोजना होतांना दिसत नाही. सरपंच व सचिवांनी मनमर्जी धोरण अवलंबले असून त्यांच्या या धोरणामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे सरपंच व सचिवांच्या कार्य पद्धतीत सुधारणा करण्याकरीता त्यांची कानउघडणी करण्याची मागणी वजा तक्रार ग्रा.प. सदस्य व गावकऱ्यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे. सरपंच व सचिव यांच्यावर उचित कार्यवाही न केल्यास संविधानिक मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही तक्रार अर्जातून देण्यात आला आहे.
राजूर ग्रामपंचायतीचे सरपंच व सचिवांनी हम करे सो कायदा हे धोरण अवलंबले आहे. सरपंच व सचिवांनी ग्रामसभा न घेता स्वतःच महत्वाचे निर्णय घेणे सुरु केले आहे. घरकुलाच्या लाभार्थ्यांचीही यादी त्यांनी स्वतःच तयार केली आहे. गरीब व दुर्बल घटकांना घरकुलाच्या लाभापासून वंचित ठेऊन आपल्या मर्जीतील लोकांना घरकुल देण्याचा त्यांनी प्रयत्न चालविला आहे. मासिक सभाही अनेकदा तहकूब करण्यात आल्या आहेत. ग्रा.प. सदस्य व गावकऱ्यांशी कुठल्याही प्रकारची चर्चा न करता मनमर्जी निर्णय घेतले जात आहे. त्यांच्या मनमर्जी धोरणामुळे गावाच्या विकासाला खीळ बसली असून गावात समस्या वाढू लागल्या आहेत. समस्यांचे निवारण करण्याकडेही सरपंच व सचिव लक्ष घालतांना दिसत नाही. गावात मलेरिया व डेंग्यूची साथ सुरु असून गावकरी या आजारांनी फणफणत आहेत. पण सरपंच व सचिव मात्र कोणत्याही उपाययोजना करतांना दिसत नाही. ग्रामपंचायतेत सरपंच व सचिवांचा मनमानी कारभार सुरु आहे. त्यांनी मनमर्जी धोरण अवलंबल्याने गावकऱ्यांमध्ये कमालीचा असंतोष खदखदत आहे. ग्रामपंचायतेत सरपंच व सचिवांची मनमर्जी सुरु असल्याने दुर्बल घटक शासकीय लाभापासून वंचित राहू लागले आहेत. त्यामुळे सरपंच व सचिवांची कानउघडणी करून त्यांच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्याची मागणी वजा तक्रार ग्रा.प. सदस्य व गावकऱ्यांनी बीडीओ कडे केली आहे. त्यांच्यावर उचित कार्यवाही न केल्यास संविधानिक मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही तक्रार अर्जातून देण्यात आला आहे.
Comments
Post a Comment