शारीरिक संबंधातून युवकाचं मन भरलं अन.. त्याने लग्नाला दिला नकार, युवतीच्या तक्रारी वरून पोलिस स्टेशनला दाखल झाली एफआयआर
प्रशांत चंदनखेडे वणी
युवतीला प्रेम पाशात अडकून तिला लग्नाचे आमिष दाखवून तिचे सतत एक वर्ष शारीरिक शोषण केल्यानंतर लग्न करण्यास नकार देणाऱ्या युवकावर शारीरिक शोषण व अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातीलच रहिवाशी असलेल्या युवतीला येथीलच एका युवकाने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला विविध प्रलोभने व आमिषे दाखवून तिच्याशी जवळीक साधली. तिला भावविवश करून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तिच्याशी संसार थाटण्याचे सोनेरी स्वप्न दाखवून त्याने आपली शारीरिक भूक भागविली. डिसेंबर २०२२ पासून त्याने तिचं सतत शारीरिक शोषण केलं. शब्दांनी मोहित करून तो तिच्यावर जीवापाड प्रेम करीत असल्याच्या भूलथापा देऊन वेळोवेळी शारीरिक संबंध प्रथापित करायचा. तिने लग्नाचा विषय काढला की तो टाळाटाळ करायचा. त्याची लग्नाप्रतीची नकारात्मक भूमिका पाहून तिने त्याच्याकडे लग्नाचा आग्रहच धरला. पण त्याने नंतर घुमजाव केले. शारीरिक उपभोग घेतला, व तिच्यापासून मन भरल्यानंतर त्याने लग्नास नकार दिला. गुलाबी प्रेमाचे स्वप्न दाखवून शारीरिक जवळीक साधल्यानंतर त्याने तिला दूर लोटले. त्याच्याकडून विश्वासघात झाल्याने तिने सरळ पोलिस स्टेशन गाठून त्याच्याविरुद्ध शारीरिक शोषणाची तक्रार नोंदविली. युवतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी सुशांत सुभाष भटकरे (३०) या युवकावर युवतीचे शारीरिक शोषण केल्याप्रकरणी भादंविच्या कलम ३७६ (२)(N), ४१७, ५०६ व अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात पो.अ. विजय वानखेडे व अमोल नुन्नेलवार करीत आहे.
No comments: