Latest News

Latest News
Loading...

त्याने गणरायाला दिलेला निरोप शेवटचा ठरला, गणेश विसर्जन मिरवणुकीत मनसोक्त थिरकलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

प्रशांत चंदनखेडे वणी 

ब्राह्मणी या गावात गणेश विसर्जनाची धडाकेबाज मिरवणूक काढण्यात आली. गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत तो धूम नाचला. ढोल ताशाच्या निनादात निघालेल्या मिरवणुकीत तो मनसोक्त थिरकला. गणेश उत्सव मंडळाचा तो अध्यक्ष होता. त्यामुळे त्याच्यात आणखीच उत्साह संचारला होता. आपल्याला सिकलसेलचा आजार असल्याचंही भान त्याला उरलं नाही. गणपतीला निरोप दिल्यानंतर त्याची अचानक प्रकृती खालावली. त्याला तात्काळ नागपूरला उपचारार्थ हलविण्यात आलं. पण त्याने उपचाराला प्रतिसाद दिला नाही. क्षणात त्याची प्राणज्योत मालवली. त्याने गणरायाला दिलेला निरोप शेवटचा ठरला. गोलू उर्फ वैभव जीवन काळे (२२) असे या दुर्दैवी मृत्यू ओढवलेल्या तरुणाचे नाव आहे. 

ब्राह्मणी या गावातील रहिवाशी असलेला जीवन हा सुस्वभावी तरुण होता. गावात त्याच्या अध्यक्षतेत मस्कऱ्या गणपतीची स्थापना झाल्याने त्याच्यात चांगलाच उत्साह संचारला होता. काल गणेश विसर्जनाची धडाक्यात मिरवणूक काढण्यात आली. ढोल ताशाच्या निनादात निघालेल्या मिरवणुकीत तो मनसोक्त थिरकला. तो सिकलसेलचा रुग्ण होता, पण ठणठणीत होता. मिरवणुकीत अति थिरकल्याने अचानक त्याची प्रकृती खालावली. त्याला तात्काळ नागपूरला हलविण्यात आले. त्याच्यावर शर्थीचे उपचार करण्यात आले. पण त्याने उपचाराला प्रतिसाद दिला नाही. आणि क्षणातच त्याची प्राणज्योत मालवली. त्याने गणरायाला दिलेला निरोप शेवटचा ठरला. सदन शेतकरी कुटुंबातील तो एकुलता एक मुलगा होता. एक बहीण तिचं लग्न झालेलं. निळापूर येथील गुप्ता कोल वॉशरीत तो वे-ब्रिज ऑपरेटर म्हणून कर्तव्यावर होता. कुटुंबाचा एकमेव आधार असलेल्या जीवनला नियतीने हिरावून घेतले. त्याच्या अशा या अकाली जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जीवन हा सुस्वभावी व मनमिळाऊ स्वभावाचा तरुण असल्याने गावात तो सर्वांचाच लाडका होता. त्याच्या निधनाची वार्ता कळताच गावात शोककळा पसरली. तरुण वयात त्याच्यावर दुर्दैवी मृत्यू ओढावल्याने गावातून हळहळ व्यक्त होत आहे. 


No comments:

Powered by Blogger.