प्रशांत चंदनखेडे वणी
स्थानिक बसस्थानक येथे एक अनोळखी महिला विष प्राशन केलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. याबाबत पोलिस स्टेशनला माहिती देण्यात आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत महिलेला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु महिलेने अखेरचा श्वास घेतल्याची माहिती मिळाली आहे. ही महिला कोण व कुठली याबाबत अद्याप शहानिशा झाली नसून पोलिस महिलेची ओळख पटविण्याचा प्रयत्न करीत आहे. या महिलेने कुठल्या विवंचनेतून आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला, हे देखील अद्याप कळू शकले नाही. ही प्रवासी महिला नेमकी कुठून आली, व कुठे जात होती, याचा पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. बसस्थानक परिसरात तिने विष प्राशन केले की, विष प्राशन करून ती प्रवासाला निघाली, ही गुंतागुंत कायम असून त्या दिशेने पोलिस तपास करीत आहे. ही अनोळखी महिला कुणाच्या परिचयाची असल्यास त्यांनी वणी पोलिस स्टेशनला माहिती द्यावी, असे आव्हान ठाणेदार अजित जाधव यांनी केले आहे.
No comments: