Latest News

Latest News
Loading...

विजया दशमीच्या दिवशी युवकाने घेतला गळफास


प्रशांत चंदनखेडे वणी 

आज विजया दशमीचा सण सगळीकडे साजरा होत असतांना एका वैफल्यग्रस्त युवकाने मात्र गळफास घेऊन जीवनाचा शेवट केल्याने कुटुंबाच्या आनंदावर दुःखाचं विरजण आलं आहे. मजुरी करून उदर्निवाह करणाऱ्या या युवकाने रुखमाई कोल वॉशरी जवळ बांधून असलेल्या झोपडीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्रथम दर्शनी समोर आले आहे. गौरीशंकर छेदु कश्यप (३५) रा. राजूर (ई) असे या आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. 

वणी यवतमाळ मार्गावरील रुखमाई कोल वॉशरी जवळ एका कारागिराने तात्पुरती झोपडी बांधून टायर पंचर दुरुस्तीचे दुकान टाकले होते. परंतु त्या ठिकाणी पंचर दुरुस्तीसाठी ग्राहकच येत नसल्याचे पाहून त्या कारागिराने ते दुकान बंद केले. पण झोपडी मात्र तशीच बांधून होती. त्या झोपडीमध्ये नंतर मृतक व त्याचे भाऊ रहायचे. ती झोपडी त्यांचा निवारा बनली होती. मजुरी केल्यानंतर रात्री झोपडीतच त्या मजुरांचा मुक्काम असायचा. काल रात्री त्या झोपडीत झोपलेला मजूर आज पहाटे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. त्याच्या भावंडांनी नंतर त्याचा मृतदेह खाली उतरविल्याचे सांगण्यात येते. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. त्याने आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल का उचलले हे मात्र अद्याप कळू शकले नाही. परंतु आज त्याचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ माजली. पुढील तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहे. 

No comments:

Powered by Blogger.