Latest News

Latest News
Loading...

त्यांना जनावरांचाही आला कळवळा, आणि केली ५१ हजारांची भरीव मदत


प्रशांत चंदनखेडे वणी 

विविध सामाजिक उपक्रम राबवून गरजू, गरिबांना मदतीचा हात देणाऱ्या संजय खाडे यांना प्राणीमात्रांचाही कळवळा आल्याने त्यांनी पशुधनाच्या संवर्धनाकरिता उज्वल गोरक्षण संस्थेला ५१ हजार रुपयांची भरीव मदत देऊन जनावरांच्या पालन पोषणाला आर्थिक हातभार लावला. रंगनाथस्वामी अर्बन निधी लिमिटेडचे अध्यक्ष असलेले संजय खाडे हे दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. दातृत्व भावना जपणाऱ्या संजय खाडे यांनी गरीब, गरजूंना विविध माध्यमातून मदतीचा हात दिला आहे. गरजू विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक उपक्रम राबवून त्यांना शैक्षणिक साहित्य देखील पुरवलं आहे. सामाजिक व धार्मिक कार्यांना वेळोवेळी आर्थिक सहाय्यता करणाऱ्या संजय खाडे यांनी मानवी संवेदना जपली आहे. सामाजिक जाणिवेतून सहकार्याची भावना ठेवणाऱ्या संजय खाडे यांना मुक्या जनावरांचाही तेवढाच कळवळा असल्याचे प्रत्ययास आले आहे. त्यांच्या उदार व्यक्तिमत्वाचं परत एकदा दर्शन घडलं आहे. जनावरांच्या संगोपनाकरिता त्यांनी उज्वल गोरक्षण संस्थेला ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत देऊन मुक्या जनावरांच्या पाठीवरून मायेचा हात फिरवला. संजय खाडे यांनी जपलेली सहकार्याची भावना प्रशंसनेस पात्र ठरली आहे. 

उज्वल गोरक्षण संस्थेला आर्थिक मदत देतांना त्यांच्या सोबत लक्ष्मीनारायण पतसंस्थेच्या अध्यक्षा संगिता खाडे, ईश्वर खाडे, उज्वल गोरक्षण संस्थेचे कार्यवाहक राजाभाऊ पाथ्रडकर, सुधाकर काळे, अजय चेंदे, प्रकाश कवरासे, अनुप खत्री, डॉ. राठोड, संजय पांडे, भगवान पोपली, मनोहर नागदेव, चंद्रकांत जोबनपुत्रा, आनंद खोकले, सुहास लांडे, प्रतीक गेडाम आदी उपस्थित होते.  

No comments:

Powered by Blogger.