ट्रक मधून स्प्रिंकलर पाईप उतरवितांना तोल जाऊन पडलेल्या हमालाचा दुर्दैवी मृत्यू

प्रशांत चंदनखेडे वणी 

ट्रक मधून स्प्रिंकर पाईप उतावितांना तोल जाऊन खाली पडलेल्या हमालाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी १० वाजताच्या सुमारास साई मंदिर जवळील उत्तरवार मशनरीज या व्यवसायिक प्रतिष्ठानाच्या आवारात घडली. तिरुपती पोचन्ना कन्नुरवार (५५) रा. जैताई नगर असे या दुर्दवी मृत्यू ओढवलेल्या व्यक्तीचे नाव आहे. 

शहरातील उत्तरवार मशनरीज या व्यवसायिक प्रतिष्ठानाच्या आवारात ट्रक मधून स्प्रिंकलर पाईप उतरवितांना तोल जाऊन खाली पडलेल्या हमालाला जबर मार लागल्याने त्याचा दुर्दैवी मृत्य झाला. दुकानदाराने स्प्रिंकलर पाईपची ऑर्डर दिल्यानंतर स्प्रिंकलर पाईप भरून आलेला ट्रक खाली करण्याकरिता हमाल बोलाविण्यात आले. ट्रक मधून स्प्रिंकलर पाईप खाली उतरविण्याकरिता काही हमाल ट्रकवर चढले. ट्रकवर चढून स्प्रिंकलर पाईप खाली उतरवीत असतांना तिरुपती कन्नुरवार या हमालाचा तोल गेला, व तो ट्रक वरून खाली जमिनीवर कोसळला. यात त्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. रोजंदारीवर कामाला आलेल्या गरीब हमालाचा असा हा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ट्रकमध्ये स्प्रिंकलर पाईपचा उंच थर असल्याने त्यावर चढलेल्या हमालाचा पाय घसरल्याने तो खाली पडला, व त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे दुकान मालकाकडून आर्थिक मदतीची अपेक्षा कुटुंबियांमधून व्यक्त होतांना दिसत आहे. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी