मनसेच्या दणक्याने बाजार समितीचे अधिकारी आले वठणीवर, आणि शेतकऱ्यांना शेतमाल ठेवण्याकरिता उपलब्ध करून दिली सुरक्षित जागा
प्रशांत चंदनखेडे वणी
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा शेतमाल ठेवण्याकरिता असलेली जागा अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांना त्यांचा माल ठेवण्याकरिता उपलब्ध करून दिल्याने शेतकरी हतबल झाला होता. शेतकऱ्यांनी बाजार समितीत विक्रीकरिता आणलेला शेतमाल त्यांना खुल्या मैदानात ठेवावा लागत असल्याने त्यांना मोठा मनःस्ताप सहन करावा लागत होता. तसेच बाजार समितीत शेतमाल ठेवण्याकरिता सुरक्षित जागा उपलब्ध नसल्याने कास्तकारांना आर्थिक भुर्दंडही सोसावा लागत होता. त्यामुळे कास्तकार चांगलेच अडचणीत आले होते. बाजार समितीच्या अधिकाऱ्यांकडून कास्तकारांवर अन्याय केला जात असल्याची वार्ता मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकर यांच्या कानावर पडताच त्यांनी कास्तकारांना घेऊन तडक बाजार समितीकडे मोर्चा वळविला. बाजार समितीच्या अन्यायकारक धोरणाला घेऊन त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. बाजार समितीत शेतकऱ्यांचा शेतमाल ठेवण्याकरिता असलेली जागा त्वरित त्यांना उपलब्ध करून द्यावी, अन्यथा शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा गर्भित इशारा मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकर यांनी अधिकाऱ्यांना दिला. फाल्गुन गोहोकर यांच्या इशाऱ्यानंतर बाजार समितीचे अधिकारी खडबडून जागे झाले, व कास्तकारांना शेतमाल ठेवण्याकरिता सुरक्षित जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
शेतकऱ्यांचे बोनस पीक असलेले सोयाबीन सोंगणीवर आले असून नैसर्गिक आपत्ती व रोगराईचा सामना केल्यानंतर कसेबसे हाती आलेले सोयाबीन बाजार समितीत विक्रीकरिता येऊ लागले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांचा शेतमाल ठेवण्याकरिता असलेल्या जागेवर व्यापाऱ्यांनी कब्जा केल्याने शेतकऱ्यांना आपला शेतमाल खुल्या मैदानात किंवा बाजार समितीच्या आवारात ठेवावा लागत होता. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच मनःस्ताप सहन करावा लागत होता. शेतमालाचा लिलाव होईस्तोर शेतमाल ठेवण्याकरिता शेतकऱ्यांना बाजार समितीत टिनाचे शेड तयार करून देण्यात आले आहे. परंतु या टिनाच्या शेडमध्ये व्यापारीच आपला माल ठेवत असल्याने शेतकऱ्यांना आपला शेतमाल खुल्या मैदानात अथवा बाजार समितीच्या आवारात ठेवावा लागायचा. त्यामुळे त्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत होता. कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांचा शेतमाल ठेवण्याकरिता असलेल्या जागेवर व्यापारीच आपला माल ठेवत असल्याची व्यथा कास्तकारांनी मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकर यांच्याकडे मांडली. फाल्गुन गोहोकर यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न गांभीर्याने घेत त्यांना घेऊन बाजार समितीवर धडक दिली. फाल्गुन गोहोकर यांनी बाजार समितीच्या अधिकाऱ्यांना मनसे स्टाईल धारेवर धरताच त्यांनी शेतकऱ्यांना शेतमाल ठेवण्याकरिता टिनाचे शेड खुले करून दिले. आणि यापुढे शेतकऱ्यांचा शेतमाल खुल्या जागेवर न ठेवता त्यांना सुरक्षित जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. मनसेच्या दणक्याने बाजार समितीचे अधिकारी वठणीवर आले. आणि शेतकऱ्यांना शेतमाल ठेवण्याकरिता बाजार समितीत हक्काची जागा मिळाली. शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाला घेऊन मनसेने नेहमीच आक्रमक भूमिका मांडली आहे. यावेळीही त्यांनी शेतकऱ्यांवर होणारा अन्याय दूर केल्याने कास्तकारांमधून समाधान व्यक्त व्यक्त होतांना दिसत आहे.
No comments: