डीबी पथकाने दुचाकी चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या, दोन दुचाकी चोरटे अटक, तीन दुचाक्या जप्त

प्रशांत चंदनखेडे वणी 

डीबी पथकाने दोन मोटरसायकल चोरट्यांना अटक केली असून त्यांच्या जवळून चोरीच्या तीन मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. ही कार्यवाही २० व २१ नोव्हेंबरला करण्यात आली. बसस्थानक येथून दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडल्याने डीबी पथक अलर्ट मोडवर आले. वर्दळीच्या ठिकाणी चोरट्यांनी हातचलाखी दाखविल्याने डीबी पथकाने चोरट्यांचा कसून शोध सुरु केला. खबऱ्यांनाही अलर्ट करण्यात आले. दरम्यान सेवा नगर येथील एका तरुणाजवळ चोरीला गेलेल्या वर्णनाची दुचाकी असल्याचे पोलिसांना कळाले. पोलिसांनी सदर तरुणाला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली असता त्याने आणखी एका दुचाकी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. त्याने चोरी केलेल्या दोन दुचाक्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. तसेच दीपक चौपाटी बार जवळून एका दुचाकी चोरट्याला डीबी पथकाने अटक केली. बार जवळ दुचाकी घेऊन उभ्या असलेल्या तरुणावर पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी त्याची चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे लागला. त्याला दुचाकीचे कागदपत्र मागितले असता तेही त्याच्याकडे नसल्याने पोलिसांनी दुचाकीसह त्याला ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने नागपूर येथून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्यामुळे डीबी पथकाने त्याला नागपूर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. 

शहरात परत दुचाकी चोरटे सक्रिय होऊ लागले असतांनाच डीबी पथकाने तपासचक्रे फिरवून त्यांच्या मुसक्या आवळल्या. डीबी पथकाने दोन दुचाकी चोरट्यांना अटक केली असून त्यांच्या जवळून तीन दुचाक्या जप्त करण्यात आल्या आहेत. शहरात दुचाकी चोरट्यांचे रॅकेट सक्रिय असून या आंतर जिल्हा रॅकेट मधील दोन चोरट्यांना डीबी पथकाने अटक केली आहे. शहरालगत असलेल्या चिखलगाव येथील सुधीर अरुण निखाडे यांची बसस्थानक येथे उभी असलेली मोपेड दुचाकी (MH २९ AY २५८५) अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. त्यांनी दुचाकीचा स्वतः शोध घेतल्यानंतर २० नोव्हेंबरला पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. दुचाकी चोरीची तक्रार प्राप्त होताच डीबी पथकाने चोरट्यांचा कसून शोध घेणे सुरु केले. दरम्यान त्यांना सेवा नगर येथे राहणाऱ्या सौरभ घनश्याम भटवलकर या तरुणाजवळ चोरीला गेलेल्या वर्णनाची दुचाकी असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ त्याला अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता त्याने एकाच नाही तर दोन गुन्ह्यांची कबुली दिली. पोलिसांनी आरोपी सौरभ भटवलकर (२०) याच्या जवळून मोपेड दुचाकी ( MH २९ AY २५८५) व हिरो होंडा स्प्लेंडर (MH २९ Z ५९३८) अशा दोन दुचाक्या जप्त केल्या असून त्याच्यावर भादंवि च्या कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल केला आहे. 

दुसऱ्या घटनेत पोलिसांनी दीपक चौपाटी बार जवळ दुचाकी घेऊन उभा असलेल्या आरोपीला दुचाकीसह ताब्यात घेतले. शहरात गस्त घालणाऱ्या डीबी पथकाला दुचाकी घेऊन उभ्या असलेल्या युवकावर संशय आल्याने त्यांनी त्या युवकाची चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्याला दुचाकीचे कागदपत्र मागितले असता तेही त्याच्याजवळ नव्हते. त्यामुळे त्याने दुचाकी चोरी केल्याचा संशय बळावल्याने पोलिसांनी त्याला दुचाकीसह ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने नागपूर येथून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपी सतीश उर्फ शेंबड्या बाबाराव मडावी (२५) रा. वार्ड क्रं. १० राळेगाव याच्या जवळून होंडा ऍक्टिव्हा (MH ३१ DF १२६६) ही दुचाकी जप्त केली असून त्याला नागपूर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. नागपूर येथून सदर वर्णनाची दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार दाखल असल्याचा नागपूर पोलिसांनी दुजोरा दिला आहे. शहरात परत सक्रिय होऊ पाहणाऱ्या दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळून पोलिसांनी त्यांचे मनसुबे उधळून लावले आहे. 

सदर कार्यवाही एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात व ठाणेदार अजित जाधव यांच्या आदेशावरून डीबी पथक प्रमुख सपोनि माधव शिंदे, डीबी पथकाचे  वानोळे, पंकज उंबरकर, विशाल गेडाम, मो. वसीम शेख, गजानन कुडमेथे यांनी केली. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी