नृसिंह व्यायाम शाळेला आर्थिक सहयोग, संजय खाडे यांनी जपलं सामाजिक दायित्व
प्रशांत चंदनखेडे वणी
श्री रंगनाथ स्वामी अर्बन निधी लिमिटेडचे अध्यक्ष संजय खाडे हे एक मदतगार व्यक्तिमत्व असून त्यांचं मदतकार्य निरंतर सुरु आहे. त्यांनी नुकतीच नृसिंह व्यायाम शाळेला आर्थिक मदत देऊन सामाजिक दायित्व जोपासलं आहे. नृसिंह व्यायाम शाळेत दिवाळी निमित्ताने आयोजित लक्ष्मी पूजन कार्यक्रमात संजय खाडे यांनी उपस्थिती दर्शवून शहरातील गौरवास प्राप्त असलेल्या या नृसिंह व्यायाम शाळेला २१ हजारांची आर्थिक मदत दिली. यावेळी त्यांचे चिरंजीव धनंजय खाडे हे देखील उपस्थित होते. त्यांच्या या आर्थिक संहयोगाबद्दल नृसिंह व्यायाम शाळेकडून त्यांचा सन्मान करण्यात आला.
नृसिंह व्यायाम शाळा ही शहरातील सर्वात जुनी व्यायाम शाळा आहे. या व्यायाम शाळेतून अनेकांनी सुदृढ शरीराचे धडे घेतले आहे. पेहलवानी शरीरयष्टी ठेवण्यात रुची ठेवणाऱ्या अनेकांनी या व्यायाम शाळेत घाम गाळला आहे. अनेक खेळाडू या शाळेने घडविले आहे. आजही विविध कवायती या शाळेत होत असतात. आखाड्या पासून तर कारट्यापर्यंतच प्रशिक्षण नृसिंह व्यायाम शाळेने दिलं आहे. शहराचा गौरव वाढविणारी ही व्यायाम शाळा असून या व्यायाम शाळेतून शरीराला आकार देण्याचे धडे असेच निरंतर मिळत रहावे, याकरिता या शाळेला आपलाही आर्थिक हातभार लागावा या निस्वार्थी उद्देशाने संजय खाडे यांनी नृसिंह व्यायाम शाळेला २१ हजारांची आर्थिक मदत दिली. संजय खाडे यांनी यावेळी आपले विचार व्यक्त करतांना म्हटले की, नृसिंह व्यायाम शाळेनं दीर्घ काळापासून आपलं वेगळपण टिकवून ठेवलं आहे. या संस्थेने अनेक उपक्रम राबवून नावलौकिक मिळवलं आहे. आरोग्य हीच धनसंपदा आहे. शरीर सुदृढ असेल तरच मन सुदृढ असतं. सुदृढ शरीर व मनानेच आपण सर्व क्षेत्रात यशस्वीरीत्या कार्य करू शकतो. आणि सुदृढ शरीराचे धडे देण्याचं कार्य नृसिंह व्यायाम शाळेने निरंतर केलं आहे.
या कार्यक्रमाला नृसिंह व्यायाम शाळेचे अध्यक्ष प्रमोद इंगोले, सचिव पुरुषोत्तम आक्केवार, सहसचिव पांडुरंग ताटेवार, कोषाध्यक्ष रमेश उगले, संचालक दिलीप येमूलवार, रमेश शर्मा, विलास आसुटकर, सूर्यकांत मोरे, कन्हैया पारखी, नरसिंह पटेल, इब्बू शेख, मुन्ना शेख, राजकुमार मोरे, प्रेम मेश्राम, देवा राठोड, कुणाल ठोंबरे, यश काकडे, सुरज गाडगे, फैय्याज अली, सय्यद समीर, बंडू निंदेकर, वैष्णवी चामुलवार, आयु उगले, अन्वी इंगोले, गौरी पिदूरकर, संकेत आक्केवार, सागर डोंगरे, छकुली वाढई, श्रावणी आवारी, डिम्पल बदखल, काजल गाडगे, शितल आडे, आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता नृसिंह व्यायाम शाळेच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले.
Comments
Post a Comment