शेतकऱ्यांनी एकत्र येणं ही काळाची गरज... संजय देरकर, अडेगाव येथे बळीराजा पूजन कार्यक्रम संपन्न
प्रशांत चंदनखेडे वणी
शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून शेतकऱ्यांनी एकत्र येणं ही आज काळाची गरज आहे, असे मनोगत शिवसेनेचे (उबाठा) नेते संजय देरकर यांनी व्यक्त केले. अडेगाव येथे आयोजित बळीराजा पूजन २०२३ या कार्यक्रमात ते अध्यक्ष म्हणून बोलत होते. त्यांनी आपल्या अधाक्षीय भाषणातून शेतकऱ्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. अडेगाव येथे नुकताच बळीराजा पूजन हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून जगदीश पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून युवासेना जिल्हा समन्वयक समीर लेनगुळे, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष केतन ठाकरे, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष आशिष झाडे यांची उपस्थिती लाभली. तर या कार्यक्रमाला अविनाश चंदनखेडे, नागेश धनकासार, भगवान मोहिते, विनोद ढुमणे, डॉ. जगन जुनगरी हे प्रामुख्याने उपस्थित होते. जगदीश पाटील यांनी आपल्या वक्तव्यातून शेतकऱ्यांची परिस्थिती मांडली. जगाचा पोशिंदाच संकटात घेरला असून आस्मानी व सुलतानी संकटाने तो पोळला जात आहे. कास्तकारांची आज दयनीय अवस्था झाली असून त्यांना नुसती आश्वासनांची खैरात वाटली जात आहे. शासनाची उदासीनता त्यांच्या पथ्यावर पडली असल्याचे विचार या कार्यक्रमातून व्यक्त करण्यात आले.
या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाची जबाबदारी प्रशांत बोबडे, शंकर झाडे, देव येवले, मंगेश झाडे, शुभम राऊत तथा संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पार पाडली.
Comments
Post a Comment