पुलाचे बांधकाम सुरु असल्याने बांधून देण्यात आलेला पर्यायी रस्ता गेला वाहून


प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी-मार्डी मार्गावरील वनोजादेवी गावाजवळ पुलाचे बांधकाम सुरु असल्याने गावकऱ्यांसाठी बांधून देण्यात आलेला पर्यायी रस्ता २२ जूनला पडलेल्या जोरदार पावसामुळे नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेला. त्यामुळे या गावाचा संपर्क तुटला असून गावकऱ्यांचे गावातून बाहेर पडणे कठीण झाले आहे. रस्ता वाहून गेल्याने नागरिकांची दैनंदिन कामे रखडली असून त्यांना महत्वाची कामे देखील पूर्ण करता आलेली नाही. रविवार हा बाजाराचा दिवस असतांनाही नागरिकांना रस्त्याअभावी गावाबाहेर पडता न आल्याने त्यांच्यामधून कमालीचा संताप व्यक्त होतांना दिसत आहे. गावकऱ्यांसाठी बांधून देण्यात आलेला पर्यायी रस्ता एकाच पावसात वाहून गेल्याने नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. तेंव्हा पुलाचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत टिकेल असा पर्यायी रस्ता वनोजादेवी गावासाठी बांधून द्यावा, अशी मागणी गावकऱ्यांमधून होऊ लागली आहे.

वनोजादेवी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मागील चार महिन्यांपासून पुलाचे बांधकाम सुरु आहे. पुलाचे बांधकाम सुरु असल्याने वनोजादेवी येथील नागरिकांसाठी तात्पुरता पर्यायी रस्ता बांधून देण्यात आला. पुलाजवळूनच हा कच्चा रस्ता बांधून देण्यात आल्याने २२ जूनला झालेल्या जोरदार पावसामुळे नाल्याला आलेल्या पुरात हा रस्ता वाहून गेला. पर्यायी रस्ता वाहून गेल्याने गावाचा संपर्कच तुटला. नागरिकांचे गावाबाहेर पडणे कठीण झाले. त्यांची दैनंदिन कामे रखडली. महत्वाची कामे त्यांना करता आली नाही. कास्तकारांना शेतात जाता आले नाही. व्यावसायिकांचे व्यवसाय ठप्प पडले. रविवार हा बाजाराचा दिवस असतांनाही गावकऱ्यांना खरेदीसाठी गावाबाहेर पडता आले नाही. नाल्याला आलेल्या पुरात हा पर्यायी रस्ता वाहून गेल्याने नागरिकांच्या कामांचा मोठा खोळंबा झाला आहे. त्यामुळे नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. पुलाचे बांधकाम सुरु असतांना पावसाळ्यात नागरिकांच्या जाण्यायेण्याचा प्रश्न निर्मण होणार नाही, किमान एवढी तरी काळजी कंत्राटदाराने घ्यायला हवी होती. पुलाचे बांधकाम पूर्ण होईस्तोर टिकेल असा पर्यायी रस्ता बांधून देणे गरजेचे असतांना अतिशय कच्चा रस्ता बांधून देण्यात आला. त्यामुळे एकाच पावसात हा रस्ता वाहून गेला. परिणामी वनोजादेवी या गावाचा संपर्क तुटला असून गावकऱ्यांचे गावाबाहेर पडणे कठीण झाले आहे. त्यामुळे वनोजादेवी या गावासाठी तात्काळ पर्यायी रस्ता बांधून देण्याची मागणी गाव वासीयांमधून होऊ लागली आहे. 


Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी