लालगुडा चौपाटी येथे हातात शस्त्र घेऊन धुमाकूळ घालणाऱ्या तरुणाला अटक

प्रशांत चंदनखेडे वणी 

शहरालगत असलेल्या लालगुडा चौपाटी येथील एका टी-शॉप समोर हातात धारदार शस्त्र घेऊन धुमाकूळ घालणाऱ्या तरुणाला पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. राजिव राधेश्याम पर्बत (२४) रा. नविन वागदरा ता. वणी असे या आरोपी तरुणाचे नाव आहे. शस्त्राच्या धाकावर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणारा हा तरुण ऑटोचालक असल्याचे कळते. पोलिस त्याला ताब्यात घेत असतांना तो पोलिसांवरच जोर आजमावण्याचा प्रयत्न करू लागला. पोलिसांची अटक चुकविण्याच्या प्रयत्नात असलेल्या या आरोपीला पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करून मोठ्या शिताफीने अटक केली. ही कार्यवाही २५ जूनला दुपारच्या सुमारास करण्यात आली.

पोलिस पथक शहरात गस्त घालत असतांना त्यांना लालगुडा चौपाटी परिसरात एक तरुण हातात शस्त्र घेऊन धुमाकूळ घालत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलिस पथक लालगुडा चौपाटी येथे पोहचल्यानंतर त्यांना तरुण हा निकेश नगराळे यांच्या टी-शॉप समोर हातात शस्त्र घेऊन धुमाकूळ घालतांना दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता तो जोर आजमावून अटक चुकविण्याचा प्रयत्न करू लागला. तेंव्हा पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करून त्याच्या मुसक्या आवळल्या. आरोपी राजिव पर्बत याच्या जवळून पोलिसांनी ४० सेमी लांबी. ३ सेमी पात्याची रुंदी, १३ सेमी प्लॅस्टिकची मूठ असलेला टोकदार चाकू व चाकूचे निमूळते प्लास्टिक कव्हर असा एकूण १००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अवैधरित्या जवळ शस्त्र बाळगून सार्वजनिक ठिकाणी धुमाकूळ घालणाऱ्या तसेच शस्त्राच्या धाकावर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीवर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.  

सदर कार्यवाही एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात प्रभारी ठाणेदार शंकर पांचाळ, एपीआय दत्ता पेंडकर, डीबी पथकाचे विकास धडसे, पंकज उंबरकर, विशाल गेडाम, मो. वसिम, गजानन कुडमेथे, श्याम राठोड यांनी केली. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी