शिरपूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे दरोड्याचा प्रयत्न फसला, दरोडेखोर अडकले पोलिसांच्या जाळ्यात
प्रशांत चंदनखेडे वणी
मोठा दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांना शिरपूर पोलिसांनी सापळा रचून मोठ्या शिताफीने अटक केली आहे. मोहरम निमित्त पोलिस स्टेशन हद्दीत रात्रीची गस्त वाढविण्यात आल्याने गस्तीवर असलेल्या ठाणेदार माधव शिंदे यांना चिंचोली फाटा परिसरात ६ ते ७ जण दरोडा टाकण्यासाठी दबा धरून बसले असल्याची खात्रीदायक माहिती मिळाली. या माहिती वरून ठाणेदार माधव शिंदे यांनी सपोनि रावसाहेब बुधावत यांच्या नेतृत्वात पोलिस पथक तयार केले. त्यांना घटनास्थळाकडे रवाना करून संशयितांना अटक करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार पोलिस पथकाने घेराव घालून रात्री १ वाजता मोठ्या शिताफीने ही गुन्हेगारांची टोळी अटक केली. पोलिसांनी घटनास्थळावरून चार आरपींना अटक केली. तर तीन आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत. या चारही आरोपींची कसून चौकशी केल्यानंतर ते दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी त्यांच्या जवळून एक कार व दरोड्यासाठी उपयोगात येणारे साहित्य असा एकूण २ लाख ४२ हजार १७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गुन्हेगारी क्षेत्रावर बारीक लक्ष ठेऊन असलेल्या ठाणेदार माधव शिंदे यांनी दरोडेखोरांचा दरोडा टाकण्याचा डाव उधळून लावला. मोहरम निमित्त शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीत रात्रीची गस्त वाढविण्यात आली आहे. ठाणेदार माधव शिंदे हे गस्तीवर असतांना त्यांना चिंचोली फाटा परिसरात ६ ते ७ चोरटे दरोडा टाकण्याच्या तयारीत दबा धरून बसले असल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे ठाणेदार माधव शिंदे यांनी सपोनि रावसाहेब बुधावत यांच्या नेतृत्वात पोलिस पथक तयार करून घटनास्थळाकडे रवाना केले. पोलिसांनी चिंचोली फाटा परिसराला घेराव घालून चार आरोपींना मोठ्या शिताफीने अटक केली. तर तीन आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. अनिल कल्लू निशाद (२७), सुनिल कल्लू निशाद (३०) दोन्ही रा. रामनगर सास्ती, ता. राजुरा, जि. चंद्रपूर, निलेश मनोहर बावणे (२५) रा. मुंगोली ता.वणी जि यवतमाळ, एक विधिसंघर्षग्रस्त बालक अशी या पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच अटक चुकवून फरार झालेल्या बंडल निशाद (२८) रा. रामनगर सास्ती, ता. राजुरा जि. चंद्रपूर, प्रफुल चौधरी (२५) रा. घुग्गुस ता. जि. चंद्रपूर, संकेत भौजेकर (२१) रा. एकोडी ता. कोरपना जि. चंद्रपूर या आरोपींना अटक करण्याकरिता पोलिस पथक गठीत करण्यात आले आहे. अटकेतील चार आरोपींची पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यांचा दरोडा टाकण्याचा प्लॅन असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या जवळून पोलिसांनी एक आलिशान कार (MH ०९ BM ०१३३) किंमत २ लाख रुपये तथा दरोड्यासाठी उपयोगात येणारे साहित्य ( लोखंडी रॉड, आरी पत्ता, पेंचीस, पेचकच) असा एकूण २ लाख ४२ हजार १७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या सातही आरोपींवर पोलिसांनी भादंविच्या कलम ३१०(४), ३१०(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या सात आरोपींनी एकत्र येत दरोडा टाकण्याचा रचलेला डाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे अपयशी ठरला. पोलिसांच्या या धडक कार्यवाहीमुळे मोठा अनर्थ टळल्याने त्यांच्या या कार्यवाहीची प्रशंसा होत आहे.
सदर कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अप्पर पोलिस अधीक्षक पियुष जगताप. एसडीपीओ गणेश किंद्रे, पांढरकवडा ठाणेदार रामेश्वर वैंजने, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळचे पोलिस निरीक्षक ज्ञानोबा देवकते यांच्या मार्गदर्शनात शिरपूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार माधव शिंदे, सपोनि रावसाहेब बुधावत, पोहेकॉ सुनिल दुबे, पोहवा गंगाधर घोडाम, प्रशांत झोड, नापोकॉ निलेश भुसे, गजाजन सावरसाकडे, पोकॉ अमित पाटील, विनोद मोतेराव, चालक विजय फुल्लुरे यांनी केली.
Comments
Post a Comment