ठाणेदार अनिल बेहेरानी यांनी विद्यार्थ्यांना केलं कायदेविषयक मार्गदर्शन


प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अनिल बेहेरानी यांनी संताजी इंग्लिश मिडीयम स्कुल मधील विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधत त्यांना कायदेविषयक सखोल मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना पिस्तूल, बंदूक व रायफलचे देखील दर्शन घडविले. एरव्ही चित्रपट व टीव्ही मालिकांमधून बघायला मिळणारी ही शस्त्रास्त्रे विद्यार्थ्यांना प्रत्येक्षात बघायला मिळाली. या शस्त्रांच्या वापराबाबतही त्यांनी विद्यार्थ्यांना विस्तृत माहिती दिली. या शस्त्रांचे गुण दोषही त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. या शस्त्रांचा बेकायदेशीर वापर केल्यास त्यापासून होणाऱ्या दुष्परिणामांबाबतही त्यांनी विद्यार्थ्यांना अवगत केले. विद्यार्थ्यांना कायद्याचे ज्ञान मिळावे म्हणून ठाणेदार अनिल बेहेरानी यांनी संताजी इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये कायदेविषयक कार्यशाळा घेतली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी दिलखुलास चर्चा केली. 

ठाणेदार अनिल बेहेरानी यांचा कायद्याचा अभ्यास दांडगा आहे. त्यामुळे कायदेविषयक मार्गदर्शन करण्याची त्यांची तळमळ दिसून येते. कायद्याचा अभ्यास नसल्याने युवापिढीमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढू लागली आहे. कायदे हातात घेण्याचे प्रमाण वाढत आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीत होत असलेली वाढ चिंतेचा विषय बनली आहे. युवकांवर गुन्हे दाखल होण्याचे प्रमाणही प्रचंड वाढले आहे. गुन्हे दाखल झाल्यानंतर शिक्षण, नोकरी व इतरही महत्वपूर्ण कामांकरिता मोठे अडथळे येतात. बाल गुन्हेगारीही प्रचंड वाढली आहे. कोवळ्या मनावर चांगले वाईट असे दोनही प्रतिबिंब उमटत असतात. मात्र अवास्तव हव्यासापोटी लहान मुलं चुकीच्या मार्गाकडे अलगद वळली जातात. नंतर त्यांच्यात वेगवेगळे आकर्षण निर्माण होते. आणि यातूनच जन्म घेते गुन्हेगारी. एकदा वाईट मार्गाकडे वळलेली मुलं नंतर चांगल्या वळणावर येत नाहीत. म्हणून त्यांना कायदेविषयक मार्गदर्शनाची नितांत गरज असते. बाल वयात त्यांना चांगल्या वाईटाची माहिती मिळाल्यास त्यांच्या वाटचालीला योग्य दिशा मिळू शकते. आणि त्यामुळेच ठाणेदार अनिल बेहेरानी हे शाळांमध्ये कायदेविषयक मार्गदर्शन कार्यशाळा घेत आहेत. 

त्यांनी वाढत असलेल्या सायबर गुन्हेगारी, स्त्रियांवरील अत्याचार व बाल गुन्हेगारी बाबत विद्यार्थ्यांचं समुपदेशन केलं. गुन्हेगारी प्रवृत्ती ही जीवनासाठी किती घातक असते, याची त्यांनी विद्यार्थ्यांना विस्तृत माहिती दिली. गुन्हेगारी प्रवृत्ती स्वतःला तर उध्वस्त करतेच पण दुसऱ्याच्याही जीवनाला धोका पोहचवू शकते. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळणे म्हणजे स्वतःला आगीत झोकण्यासारखे असल्याचे त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना पटवून दिले. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना पिस्तूल, बंदूक व रायफल प्रत्येक्षात दाखविली. त्यांचा वापर करण्याबाबतही मार्गदर्शन केले. या शस्त्रांच्या बेकायदेशीर वापरामुळे होणारे दुष्परिणामही त्यांनी समजावून सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रमेश येरणे होते. तर संस्थेचे उपाध्यक्ष ओमप्रकाश निमकर, सचिव धनंजय आंबटकर, सहसचिव तानाजी पाउणकर, संजय पोटदुखे, शोभना गंधारे, सिमा कुरेकार हे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन दिकुंडवर यांनी केले. या कार्यशाळेला विद्यार्थी व पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. 


Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी