राजकीय व सामाजिक क्षेत्रात तत्पर असलेल्या इजहारभाई शेख यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
प्रशांत चंदनखेडे वणी
काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष, न.प. कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यात नेहमी तत्पर असलेले इजहारभाई शेख यांचा आज वाढदिवस ! त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा 🥀🥀🎂🎂
राजकीय व सामाजिक क्षेत्रात स्वतःची एक अलग ओळख निर्माण करून आपलं वेगळपण टिकवून ठेवणारे इजहारभाई आजही राजकारण व समाजकारणात तेवढेच तत्पर आहेत. राजकीय कार्य असो की सामाजिक उपक्रम ते नेहमीच पुढाकार घेतात. जनसेवेच्या कार्यात त्यांचा नेहमी हातभार लागतो. मदतगार म्हणून त्यांची शहरात ओळख आहे. गरजू गरिबांसाठी त्यांनी नेहमी मदतीचा हात पुढे केला आहे. कित्येकांना त्यांनी सढळ हाताने मदत केली आहे. सर्वसामान्यांचा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. अन्यायविरुद्धही त्यांनी वेळोवेळी आवाज उठविला आहे. पक्षासाठीचंही त्यांचं कार्य अपार आहे. निष्ठावान नेते म्हणून त्यांची पक्षात ओळख आहे. जनसेवा हे त्यांचं जिव्हाळ्याचं कार्य राहिलं आहे. समाजकार्यात स्वतःला वाहून घेणारे इजहारभाई एक हक्काचा माणूस म्हणून समोर आले आहे. सर्वांशीच त्यांचे सलोख्याचे संबंध राहिले आहे. एक कर्मठ राजकारणी व समाजधुरणी म्हणून नावारूपास आलेल्या इजहारभाई शेख यांचा आज वाढदिवस असून त्यांच्यावर शहरासह तालुक्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
इजहारभाई शेख यांना वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा 🥀💮🎕🥀🥮
शुभेच्छुक :- सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व मित्र परिवार वणी विधानसभा क्षेत्र
Comments
Post a Comment