फिरायला जातो म्हणून घराबाहेर पडलेली मुलगी बेपत्ता, फूस लावून पळवून नेल्याचा संशय
महाविद्यालयीन शिक्षण घेणारी १६ वर्षीय विद्यार्थिनी २९ जुलैला रात्री ८ वाजताच्या सुमारास घरून अचानक बेपत्ता झाली. फिरायला जातो म्हणून ही अल्पवयीन मुलगी घराबाहेर पडली. मात्र उशिरापर्यंत ती घरी न परतल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध घेणे सुरु केले. मैत्रिणी व नातेवाईकांकडे शोध घेऊनही ती कुठेच आढळून न आल्याने पालक चांगलेच चिंतेत आले. शेवटी मुलीच्या आईने पोलिस स्टेशन गाठून मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली. मुलीला कुणीतरी फूस लावून पळवून नेल्याचाही संशय मुलीच्या आईने तक्रारीतून व्यक्त केला आहे. महिलेच्या तक्रारी वरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध भादंविच्या कलम १३७ (२) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून मुलीचा शोध घेतला जात आहे.
Comments
Post a Comment